Saturday 22 February 2014

Sadguru Aniruddha Bapu's Thursday Discourse (13.02.2014)

॥ हरि ॐ ॥

सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा, आशीर्वाद, बिनधास्त... लहान मुलांपेक्षा मोठ्यांनी टाळ्या वाजवल्या. बरोबर, परीक्षा प्रत्येकाची चालू असते.

आता स्वस्तिक्षेम संवाद जो करायचाय तो वेगळ्या पध्द्तीने ... आधी सर्व मंगल मांगल्ये... म्हणणार मग डोळे बंद करायचे नाहीत... प्रवचन होईल आणि मग शेवटचा मंत्र. यातच तुमचा संवाद साधला जाणार आहे. हा असा संवाद काही दिवस असेल कायम नाही.

आजपर्यंत आपण अंकुरमंत्रातील ॥ ॐ रामवरदायिनी श्री महिषासुरमर्दिन्यै नमः ॥ हे पद बघत आलोय. आजपासून अंकुरमंत्रातलं चौथे पद

॥ ॐ रामनामतनु श्री अनिरुध्दाय नमः ॥ हे पद बघणार आहोत.

इथे आपल्याला नीट पहायचंय राम म्हणजे काय? रामनाम म्हणजे काय? रामनामतनु म्हणजे काय? अनिरुध्द म्हणजे काय? ते पहायचे आहे. अनिरुध्द म्हणजे किचकट, complicated, समजायला कळायला कठीण. हा जो कुणी आहे तो तिचा लेक आहे. हा अनिरुध्द नक्की कोण? हा राहतो कुठे? करतो काय? हा आला कुठून? रामनामतनु म्हणजे काय? नक्की हा माझ्याशी - सगळ्यांशी कसा जोडलेला आहे?

आपण मातृवात्सल्यउपनिषदामध्ये बघतो, तीर्थयात्री असतात. परशुराम, नित्यगुरु आणि त्रिविक्रम. त्यातला त्रिविक्रम म्हणजे अनिरुध्द. हा कोणाचा नाही. हा पूर्णपणे, स्वतंत्रपणे प्रगटवला गेला आहे. या त्रिविक्रमाची माहिती आपण पाहिली. त्याचं अदभूत चिन्ह आपण गुरुक्षेत्रम्मध्ये पाहतो. हा त्रिविक्रम एकाच वेळेस तीन पावलं चालतो म्हणजेच एकाच वेळॆस तीन पावलं उचलतो. आपण एका वेळेस एकच पाऊल चालू शकतो. हा तीन पावलांत तीन लोकं व्यापू शकतो. स्थूलदेह, प्राणदेह, मनोमय देह व्यापतो. तीर्थयात्रा सुरू होते. हा त्रिविक्रम नित्यगुरु, परशुराम, उत्तम, मध्यम, विगताला बरोबर घेऊन आहे. हाच मैत्रेयीला देखील थांबायला सांगतो. विगतच्या डोळ्यांची पट्टी काढायला हाच सांगतो.

ह्या त्रिविक्रमाचा नक्की रोल काय? त्रिविक्रम हा प्रगटविला गेला पण कधी? याचं रूप काय? हा काळा? गोरा? ह्याला डोळे किती? कान किती? याचं रूप नक्की काय? त्रिविक्रमाचं अदभूत चिन्ह काय आहे? कृपासिंधूत ह्यावर योगिन्द्रसिंह जोशी यांनी छान लेख लिहिला आहे. नक्की हा त्रिविक्रम म्हणजे उत्पन्न केलाय का? प्रकट केलाय? ह्याचं प्रगटणं म्हणजे नक्की काय? चण्डिकाकुलामध्ये त्रिविक्रम आहे का? की नाही आहे? नक्की काय आहे? चण्डिकाकुलात आपण पाहतो ती माय चण्डिका बसलेली आहे. तिच्या एका बाजूला दत्तगुरु तर दुसर्या बाजूला हनुमन्त आहे. किरातरुद्र आणि शिवगंगागौरी आहे. देवीसिंह आहे. मग त्रिविक्रम कोठे आहे? जर हा चण्डिकुलाच्या बाहेरचा नाही तर त्याचा फोटो का नाही चण्डिकाकुलामध्ये? हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे.
मनुष्याच्या जीवनाच्या स्वार्थाचा प्रांत असो कि नि:स्वार्थाचा प्रांत असो, आपल्या प्रत्येकाला स्वत:त बदल आवश्यक असतात व त्यापेक्षा बाहेरच्या जगात बदल हवे असतात. माणूस तिसर्या माणसाला ओळखू शकतो पण स्वत:ला नाही. स्वत:मध्ये बदल घडवणे आवश्यक असते. आपले ध्येय काय असते.

- अनुकूल बदल आत घडवणे

- अनुकूल बदल बाहेर घडवणे

- अनुकूल बदल प्रारब्धात घडवणे

हे सगळे बदल एकाच वेळेस, All Three Simultaneously. ही तीन पावलं ह्या त्रिविक्रमाची. तिन्ही गोष्टी (अनुकूल) एकाचवेळी घडणं. ह्या तीन गोष्टी म्हणजे त्याची तीन पावले एकाच वेळेस पडत असतात.

साप चावणं हे जर प्रारब्ध असेल तर एकाच वेळेस त्याचे प्रारब्ध बदलणं (त्याच्या प्राणमय देहाला जपणं), सापाचं विष शरीरात भिनणार नाही हे पहाणं त्याचवेळेस Doctor उपलब्ध करून देणं हे सर्व एकाचवेळेस पाहतो, करतो. तो त्रिविक्रम पूर्ण रात्र झालीय, रात्रीचे बारा वाजलेत तरीही उगवतीचा सूर्यही असणं, मध्यान्हीचा सूर्य असणं व मावळतीचा सूर्य असणं असं तिघांनाही आणून ठेवतो आणि रात्रदेखील अबाधित ठेवतो तो त्रिविक्रम. हे तिन्ही करण्याची ज्याची ताकद आहे तो त्रिविक्रम. हे मनोराज्य नाही, सत्य आहे. आपण प्रत्येकजण अनुभवतो.

आपण श्वास घेतो. तो फुफ्फुसात जातो. श्वास बाहेर पडतो या एकामागोमाग घडणार्या क्रिया आहेत. एकाच वेळी होत नाहीत म्हणजे एकापाठोपाठ पडणारी पावलं. पण त्याच क्षणाला Morning walk घेताना track-suit घातलायं, आणि समोर साप आला आणि त्याने फस्स केलं तर काय होईल? दातखिळी बसेल, हात-पाय थरथरतील, घशाला कोरड पडेल, जीभ लुळी पडेल, तोंडाला फेस येईल, पोटात गोळा येईल, वर कोरडं आणि खालून..... एकाच वेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडतात. हो ना? कशामुळे? भीतीचा stimulus. कारण Adernaline हा Sympathetic Nervous System चा भाग आहे. ही विविध भागांवर एकाच वेळेस काम करते. कशी? एक महत्वाची Nerve आहे vagus nerve जी वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळे कार्य करते. ही एकच nerve stimulate झाली की stomach मध्ये acid चं secretion वाढते. Diaphragm च्या वर suppression चं काम करते तर खाली stimulate करते. हार्टचा pulse rate कमी करते. हीच nerve शी / शू पास करण्याच्या नियंत्रणाचं महत्वाचं काम करते. प्रजननाच्या control चं पण काम करते. म्हणजेच एकाच वेळेस वेगवेगळ्या अवयवांवर वेगवेगळं कार्य करते.

असाच त्रिविक्रम असला पाहिजे. जशास तसा. चांगल्यासाठी अतिशय चांगला. वाईटासाठी अतिशय वाईट. त्याला कुणी कितीही शिव्या घातल्या तरी ह्याला काही फरक पडत नाही. त्याची जी माय चण्डिका हिला जो आपलं मानत नाही त्यांना तो आपले मानत नाही. त्याच्या आई ’चण्डिकेवर’ विश्वास ठेवतो की नाही हाच criteria. जे चण्डिकेचे भक्त नाहीत त्यांच्यासाठी हा criteria नाही. त्या भक्तामध्ये कितीही चुका / पापं असेना, त्यांच्याकडे जी क्षमता असेल त्या क्षमतेनुसार तो वागतो.

समजा जर भक्त पांगळा असेल, त्याची ताकद पण ५०% कमी झाली असेल. तर तो ती कमी ताकद हा त्रिविक्रम बनतो, त्याला दुरुस्त करतो मग बाहेर पडतो म्हणजेच तो ५०% पूर्वी जसा होता तशी स्वत:ची प्रतिकृती तयार करतो, त्या माणसात ती फीट करतो व तरीही नामानिराळा राहतो. हे एक कौशल्य त्या त्रिविक्रमाचे आहे जशास-तसा.

आम्ही एवढ्या चुका करून ठेवल्या आहेत तर तो दुरुस्त करणार कसा? हा त्रिविक्रम सातत्याने स्वत:ची कंपनं पोहोचवत असतो. ब्रम्हाण्डच ज्याचं शरीर आहे तो त्रिविक्रम काय करू शकत नाही? आम्ही ह्या त्रिविक्रमाची एक क्षुल्लक पेशी आहोत पण त्याची आहोत. आम्ही त्याच्या शरीराचा part & parcel आहोत. आम्ही त्याच्या शरीराचा लहान का होईना पण भाग आहोत, म्हणून तो त्याची स्पंदनं सतत पसरवत राहतो.
त्रिविक्रमाचं हृदय सर्वांमध्ये स्वत:ची कंपनं पाठवतो. ते कायम pumping करतं म्हणून मी जिवंत आहे. Heart म्हणजे ’प्रेम’ म्हणजेच त्याचं प्रेम कायम आमच्यापर्यंत पोहोचणारच असतं. जी vibrations pump करणार ती आपोआप माझ्यापर्यंत पोहोचणारच आहेत.

१. जर चण्डिकेला मानता तरच त्याचा हिस्सा आहोत.

२. Block कधी तयार होतो? जेव्हा त्रिविक्रमावर विश्वास ठेवत नाही. Heart Attack कसा येतो? Heart ला supply करणार्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो तेव्हा. जेव्हा मनुष्याचा त्रिविक्रमावर विश्वास नसतो तेव्हा हा Block तयार होतो. चण्डिकाकुलावर विश्वास आहे म्हणजे त्रिविक्रमावर विश्वास आहेच. हा त्रिविक्रम काम कसा करतो? हा एका विशिष्ट mechanism मध्ये काम करतो. हे वैश्विक आहे. गणित तयार नाही केलं गेलं. उत्पन्न नाही केलं गेलं. हा पण एक algorithm च आहे. हा algorithm आज आपल्याला बघायचा आहे.

1 x 1 = 1
11 x 11 = 121
111 x 111 = 12321
1111 x 1111 = 1234321
11111 x 11111 = 123454321
111111 x 111111 = 12345654321
1111111 x 1111111 = 1234567654321
11111111 x 11111111 = 123456787654321
111111111 x 111111111 = 12345678987654321

ह्या निसर्गात घडणारी प्रत्येक क्रिया ही या algorithm सारखी घडते. तो एकच असा आहे.

त्रिविक्रम = १ (no. 1). १ ने कोणत्याही संख्येला भागून काहीही फरक पडत नाही आणि १ ने गुणलं तरी तेवढंच राहतं.

ह्या सृष्टीत सगळीकडे हा त्रिविक्रमच फिरतोय. एकाच वेळी तो स्वत:त दोन वेळा बनू शकतो. जर तुमची frequency ३ वेळची आहे तर तो ३ वेळा बनू शकतो. प्रत्येक वेळी जेव्हा तो स्वत:ला multiply करतो तेव्हा सगळीकडे हा त्रिविक्रमच खेळतोय. हा सगळा ९ पर्यंतचा खेळ समर्थपणे तो खेळतो. त्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज त्याला नाही आहे. हा Bilaterally symmetrical बनतो. म्हणजेच समान न्याय देतो. मध्यरेषेच्या दोन्ही बाजूला समान. तुमच्यासाठी हा खेळ खेळत असताना तुमची जी frequency ची गरज आहे तिकडे तो तुम्हाला आणून ठेवतो. जर ९ आहे तर ९ वर आणून ठेवतो. तो स्वत: कायम एकच राहतो. तो एकच जरी असला तरी त्याचवेळेस दुसरा ’१’ पण त्याच्याकडे तयार आहे, ३ रा पण त्याच्याकडे आहे.

’एक’ च आकडा बेरीज नाही, वजाबाकी नाही, भागाकार नाही त्रिविक्रमाने जेव्हा सृष्टी उत्पन्न केली ती गुणाकाराच्या पद्धतीने म्हणजेच progress कसा आहे तर fast आहे. Progress is fast. ही ताकद एकट्या त्रिविक्रमाची. तो ’एकच’ असतो. तो कायम ’एक’ च आहे आणि म्हणूनच त्याने दिलेला शब्द कधीच बदलत नाही. त्याचं वचन ’एक’, त्याचा संकल्प एक’, त्याचं अस्तित्व ’एक’ तो कोणालाही copy करत नाही आणि त्याची copy कुणीही कधीच करू शकत नाही. म्हणून तो ’एक’च.

He does not copy anybody and No one can copy him

असा तो एकमेव ’एक’

हा सगळा प्रवास आपण बघतो तो दोन्ही बाजूने समान. आपल्या शरीरात ९ चक्र, ७ जागृत, २ सुप्त अवस्थेत.

हा एक असताना (Bilaterally Symmetrical), जशी घडी घातलेली असेल तशीच उलगडली तर चुरगळत नाही.

आपण काही करतो तेव्हा ताकद कमी पडते. प्रारब्धातील पुण्याचा साठा संपलाय. तर त्याची परतफेड तोच करतो तुम्ही जर चौथ्या स्टेजवर आहात. सगळं आहे पण हा नाही तर काहीही नाही. आमचा याच्यावर प्रचंड विश्वास असायला हवा. हा स्वत:च कर्ज देतो आणि स्वत:च ते कर्ज फेडतो. असा सावकार कुठे जगात मिळणार नाही. हा एकच असा आगळा वेगळा.

हा एकच असा आहे. जो ह्यासाठी व्रत करेल, तपश्चर्या करेल पण जोपर्यंत चण्डिकाकुलावर विश्वास आहे. चण्डिकाकुलाला मानता आणि जर त्रिविक्रमावर विश्वास नसेल तर त्या त्रिविक्रमाचा तुमच्याकडचा supply त्याची ती आई बंद करते. ती कवाडं बंद करते. (बये दार उघड...) तुम्ही त्याला लाथाडलंत तरीही तो तुमच्यावर प्रेम करतच राहतो पण ती ते तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही.

हा जो सातत्याने झगडतोय, जीव तोडतोय त्याच्यावरच जर विश्वास नाही तर ती माय चण्डिका उभी राहते. तिला तिच्या लाडक्या त्रिविक्रमाची काळजी आहेच. जेव्हा चुकीची माणसं या त्रिविक्रमाचा चुकीच्या पद्धतीने फायदा घ्यायला बघतात आणि तरीही तो मदत करायला बघतो तेव्हा ही माय चण्डिका काय करते?

ती फक्त एकच करते. ही आदिमाता दुर्गा

१ २ ३ ४ ५ ६ ७ ॥८ ९

८ या स्थानी येऊन उभी राहते. त्याचा पुढचा प्रवास ती होऊ देत नाही. ती परतफेड त्या माणसाची त्या माणसालाच करावी लागते. स्वत:ची कर्जे स्वत:लाच फेडावी लागतात. जी खूप difficult असतात.

मग आम्हाला काय करायचे? तर आमचा त्या त्रिविक्रमावरचा विश्वास डळमळू न देण्यासाठी त्याच्या आईची प्रार्थना करायची. त्रिविक्रमावरचा विश्वास म्हणजे त्रिविक्रमाच्या हेतूवरचा विश्वास. तिने दिलेले नियम खूप strict आहेत. ते सर्व पाळून, तुमच्यासाठी जो सतत Partiality करतो, धडपडत राहतो, सतत प्रयास करतो त्यावर विश्वास हवा. त्याच्या हेतूविषयी विश्वास हवा. जे माझ्या जीवनात घडतेय ते ती माय चण्डिका तिच्या पुत्रांकरवी घडविते. आम्हाला जे काही हवंय ते आम्ही परमात्म्याकडून मागतो. इथे त्रिविक्रमाचा दुसरा सिद्धांत आमच्या लक्षात यायला पाहिजे. त्रिविक्रम तुम्हाला काय हवे त्यापेक्षा तुमच्यासाठी काय आवश्यक आहे ते पुरवितो. त्याच्या हेतूविषयी आम्हाला विश्वास हवा की, हा जे काही आमच्या आयुष्यात करतो ते आमच्या चांगल्यासाठीच असायला पाहिजे मग भले ती गोष्ट वाईट असेल, अशुभ असेल तरीही ती माझ्या चांगल्यासाठीच. माझ्या जीवनात जे काही घडतेय ते ती माय चण्डिका त्याच्या इच्छेने घडविते. जरी वाईट घडले तरी त्यातून चांगलंच होईल हा विश्वास.

ह्या त्रिविक्रमाच्या Algorithm ला ’एकांक’ Algorithm म्हणतात. एकांक : तो एकच : प्रत्येक shape, आकार तो घेतो rhythm मध्ये. ह्यात आम्हाला झेपेल असा क्रम आहे. तो १ ते ९ आकडे तयार करतो rhythm मध्ये. तुमचा प्रवास क्रमाक्रमाने घडवून आणतो. धक्काबुक्की नाही.

आपण माणसं एका वेळी एकच पाऊल टाकू शकतो हे तो जाणतो म्हणून तो एक झाला. तुमचा स्वभाव एक आहे म्हणून तो एक. तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट क्रमवार का घडते? त्रिविक्रमामुळे माझं अधिकाधिक चांगलं तोच घडवून आणणार आहे. He always cares for you, हा विश्वास हवा मग धक्के खात खात जगावं लागत नाही.

त्रिविक्रमाचा नंबर १, त्याचा algorithm देखील १. ह्यापुढे त्रिविक्रमाच्या हेतूबद्दल पूर्ण विश्वास ठेवायचा. आता कायम एक गोष्ट लक्षात येईल, आमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट क्रमाक्रमाने का घडते तर त्रिविक्रमामुळे. माझं अधिकाधिक चांगलं तोच घडवून आणणार आहे.

आता शांत चित्ताने डोळे बंद करून आदिमातेचे तुम्हाला आवडते रूप, प्रतिमा डोळ्यांसमोर आणा आणि काहीही मागू नका. आज तो त्रिविक्रम तुम्हाला BEST असेल तेच देणार आहे.

॥ नम: सर्वशुभंकरे। नम: ब्रम्हत्रिपुरसुन्दरी। शरण्ये चण्डिके दुर्गे। प्रसीद परमेश्वरि ॥

॥ हरि ॐ ॥

No comments:

Post a Comment