About Bapu

Detailed information about Bapu

 हरी ओम

अनिरुद्धमहिमा

बापुंबद्दलची भौतिक माहिती

१) बापूंचे पूर्ण नाव`-  डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी

२) बापूंचा जन्म - त्रिपुरारी पौर्णिमा १८ नोव्हेंबर १९५६ - पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी झाला.

३) बापूंच्या आई - सौ. अरुंधती धैर्यधर जोशी आणि

४) बापूंचे वडील - डॉक्टर धैर्यधर हरेश्वर जोशी. बापूंचे वडीलही डॉक्टर होते.

५) बापू लहान असताना आपल्या आजीकडे म्हणजे सौ. शकुंतला .नरेंद्र पंडित, ज्या माहेरच्या मालती गोपीनाथाशास्त्री पाध्ये, ह्यांच्याकडे राहत, आणि आजीनेच त्यांचं संगोपन केले.

६) बापू ८ वर्षांचे असताना वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात आजीनेच त्यांचं नामकरण 'बापू' असं केलं. तेव्हापासून अनिरुद्धाना सर्वजण 'बापू' म्हणून ओळखतात.

७) बापूंच्या पणजी म्हणजेच बापू ज्यांना प्रेमाने 'माई' संबोधतात, त्या सौ. द्वारकामाई गोपीनाथशास्त्री  पाध्ये आणि बापूंचे मानवी सदगुरू श्रीविद्यामकरंद गोपीनाथशास्त्री पाध्ये यांचा बापूंवर विशेष प्रभाव होता.

८) बापूंचं शालेय शिक्षण मोंटेसरीपासून अकरावी matric पर्यंत मुंबईतल्या परळच्या डॉक्टर शिरोडकर हायस्कूल या शाळेत झालं. घरात दोन दोन गाड्या असूनही बापूंच्या वडिलांनी त्यांना या शाळेत घातलं, जिथे प्रामुख्याने कष्टकरी व कामगारांची मुलं शिकायला येत - त्यामुळे त्या मुलांची परिस्थिती व समस्या बापूंनी जवळून बघितल्या.

९) बापूंचं वैद्यकीय शिक्षण अर्थात एम.बी.बी.एस. आणि एम.डी. (मेडिसिन) मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये झालं.

१०) बापू आयुर्वेद उत्तम जाणतात. आधुनिक वैद्यकशास्त्र कितीही प्रगत झालं, तरी प्राचीन भारतीय आयुर्वेदाची ताकद ओळखून व आयुर्वेद हा पाचवा वेदच मानून त्याच्या आधाराने त्यांनी अभ्यास व संशोधन केलेलं आहे. या अभ्यासादरम्यान बापूंचा वैद्य अंतरकर ह्यांच्याशी संबंध आला.

११) त्यानंतर त्यांनी परळ व्हिलेज आणि दादर इथे प्राक्टीस सुरु केली. दादर - आपटेवाडी इथे सकाळी १०.३० ते १२.३० पर्यंत आणि परळ व्हिलेज इथे दुपारी १.३० ते रात्री १२.३० पर्यंत बापूंचा दवाखाना सतत पेशंटनी भरलेला असायचा.
  
आमचा बापू आमच्यासारखाच

१) रोजच्या जीवनामध्येसुद्धा बापूंची रहाणी आजच्या काळानुरूप सर्वसाधारण माणसाप्रमाणेच आहे.

२) आजही बापू मुलांचा अभ्यास घेतात. शैक्षणिक क्षेत्रात मुलांची अधिकाधिक प्रगती कशी होईल, ह्या दृष्टीने त्यांच्या डिफिकलटिज सोडवणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे ते सुरुवातीपासून आवडीने करत आलेले आहेत.

३) बापू आजही चांगले चित्रपट / नाटकं वगैरे पहायला आपल्या कुटुंबाबरोबर जातात. मराठी, हिंदी चित्रपट, तसेच शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, चित्रपटसंगीत ह्यांबद्दलसुद्धा त्यांना प्रचंड माहिती आहे. कुठल्याही गाण्याचे गीतकार, संगीतकार, त्याबद्दलची एखादी विशेष घटना ह्याबद्दलसुद्धा ते सहजतेने बोलतात.  

४) तसच चांगलं साहित्य वाचण्याची आणि चांगलं संगीत ऐकण्याचीही त्यांना आवड आहे. १३ कलमी योजनेच्या भाषणामध्येही त्यांनी दोन हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचाच संदर्भ दिला होता. ('तस्वीर बनाता हुं, तस्वीर नही बनती' आणि 'तदबीर से बिगडी हुई तकदीर बना दे, अपने पे भरोसा है तो इक दांव लगा ले' ). तसेच मराठी भाषेच्या क्लासमध्येदेखील त्यांनी काही 'क्लासिक' हिंदी गाण्यांवर लेक्चर्स घेतली होती.

५) आपल्या कुटुंबाबरोबर व आप्तांबरोबर बापू आजही ठिकठिकाणी फिरायला जातात व आवर्जून सांगतात - जीवनात विरंगुळा म्हणून आपल्याला फिरण्यासाठी वेळ काढता आलाच पाहिजे.' कामाच्या वेळेस कामाला पूर्ण न्याय आणि मजेच्या वेळेस पूर्ण मजा ' हे तत्व जर प्रत्येकाने अवलंबल, तर प्रत्येकाचंच जीवन आनंद होईल असं बापू सांगतात.

६) बापूंच्या मुलांच्या लग्नात बापूंनी शेरवानी व सूट घातला होता, तसेच वरघोड्याच्या वेळेस बापू सगळ्यांबरोबर नाचलेसुद्धा होते. मुलीला सासरी पाठवताना प्रत्येक मुलीच्या वडिलांना जसे दुःख होते, त्याच शोकाने विव्हल झालेल्या बापूंना अनेकांनी बघितलेच.

७) बापू मोटारसायकल - बुलेट आणि कारही चांगली चालवत असत. गाडी चालवणं म्हणजे वेगाने पळवणं नाही, तर त्याच्यावर नियंत्रण राखता आलं पाहिजे असं बापू वारंवार सांगतात.

८) बापूंच्या आईवडिलांच्या निधनानंतर त्यांचे सर्व अंतिम संस्कार बापूंनी स्वतःच्या हातांनी केले व आपल्या व्यक्तींच्या जाण्याने जेवढे दुःख आपल्याला होते, तेवढेच दुःख बापूंनाही झाले. त्या वेळेस अत्यंत शोकाकुल झालेल्या बापूंना बघून आपलेसुद्धा अश्रू नकळत बाहेर आले.
  
तरीही बापू आगळेवेगळेच - बापू, द युनिक!

१) बापूंना शिकवणारे शिक्षकही बापूंकडे येतात. जी. डी. पाटील सर आवर्जून सांगतात की त्या वेळच्या बापूंमध्ये व आत्ताच्या बापूंमध्ये काहीही फरक नाही.

२) बापूंचे मेडिकल क्षेत्रातील गुरु डॉक्टर शानबागसर ह्यांना आजही आदराने नमस्कार करताना अनेकांनी पाहिले आहे. बापूंच्या मुलांच्या लग्नामध्ये ह्याच दोन्ही सरांनी अत्यंत प्रेमाने अंतरपाट धरला होता.

३) नायर हॉस्पिटलमधील त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये बापू अनेक डॉक्टरांपेक्षा वयाने दहा ते चौदा वर्षांनी जुनियर असूनही पोस्टनुसार  अनेकांना सिनियर होते.

४) डॉक्टर नर्सिकर हे आजही सांगतात की तेव्हासुद्धा बापू जुनियर डॉक्टरांच्या ग्रुपमध्ये येऊन सहजतेने सामील व्हायचे, गप्पागोष्टी  करायचे. खरं तर बापूंच्यासारख्या असणारया इतर डॉक्टरांना मात्र हे जमायचे नाही व त्यांना बापूंचा तेव्हाही हेवा वाटायचा की कसे हे डॉक्टर जोशी त्यांच्या जुनियर्समध्येसुद्धा   मिसळून जातात.

५) नायर हॉस्पिटलमधील स्टाफ नर्सेस व वार्डबोय ह्यांच्याबरोबर व इतर डॉक्टरांबरोबर असणारी बापूंची वागणूकही समानच होती. स्टाफ नर्सेस किंवा वार्डबोय म्हणून बापूंनी त्यांना कधीच कमी लेखले नाही आणि म्हणूनच डॉक्टर जोशी रात्रअपरात्री कधीही राउन्डला आले तरी ते सर्वजण प्रेमाने डॉक्टर जोशींना सर्व मदत करायचे.

६) बापूंचे विचार शिक्षकांनाही मार्गदर्शन वाटतात.' शिक्षणाचा अश्वमेध ' हे भाषण त्यांनी आयईएसच्या शिक्षकांसमोर करून त्यांना सुरेख मार्गदर्शन केलं होतं.

७) मराठी, इंग्लिश, हिंदी, गुजराती ह्या चारही भाषांवर बापूंचे प्रभुत्व आहे.

८) मराठी मातृभाषा नसलेल्या श्रद्धावान मित्रांना मराठी शिकवण्यासाठी बापू स्वतःच दर मंगळवारी साडेतीनशे विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचा क्लास घ्यायचे.

९) बापू लहान मुलांमध्येदेखील तेवढ्याच सहजतेने मिसळतात व त्यांच्या खेळात समरस होतात. हे बघून आपल्यालाही आपले बालपण बापूंबरोबर असावे, असे वाटते. लहान मुलांच्या धांगडधिंगा शिबिरामध्ये त्या मुलांबरोबर मनसोक्त नाचताना अनेकांनी बापूंना बघितलं आहे.

१०) शिरडी व अक्कलकोटच्या रसयात्रेमध्ये आलेल्या सर्व भक्तांना बापू स्वतः जेवण वाढत होते. तसेच जुइनगरच्या मंदिरातदेखील पाण्याचे बॉक्सेस हलविण्यासाठी बापूंनी स्वतः इतर कार्यकर्त्यांना केलेली मदत अनेकांनी बघितली आहे. हा सदगुरू नुसता आसनावर बसून सर्वांना कृपाशीर्वाद देणारा नसून सर्वांबरोबर मिसळून जाऊन त्यांच्यातलाच एक होऊन जाणारा त्यांचा खरा मित्र आहे.
  
सदगुरू बापू - श्रद्धावानांचा मित्र

१) बापू स्पष्टपणे सांगतात की मी कोणाचाही अवतार नाही. मी आधीही अनिरुद्धच होतो, आजही अनिरुद्धच आहे आणि उद्याही अनिरुद्धच असेन;
२) मी तुमचा मित्र आहे - कधीही दगा न देणारा आणि तुमच्यावर कुठल्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणारा;
३) परमेश्वरी तत्त्वांवर नितांत प्रेम व अविचल श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाचा मी दास आहे;
४) मी जादूगार नाही. हातचलाखीचे चमत्कार मला करता येत नाही. माझ्याकडे आहे फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेमच, माझ्याकडे दुसरे काहीही नाही;
५) मी योद्धा आहे आणि ज्यांना ज्यांना म्हणून आपल्या प्रारब्धाशी लढायचे आहे, त्यांना युद्धकला शिकविणे हा माझा hobby आहे.
६) सत्य, प्रेम, आनंद हाच माझा मार्ग आणि धर्म आहे. माझ्या मार्गावरून चाला असं माझं म्हणणही नाही आणि आग्रहही नाही. मी मात्र माझ्या मार्गावरून चालतच राहणार आणि जो माझ्याबरोबर येईल, त्याला मी कधीच टाकणार नाही.
७) १९९६ पासून बापूंनी स्वतःच्या घरी प्रवचनाला सुरुवात केली. नंतर प्रवचनाला येणाऱ्यांची संख्या वाढत गेली, मग समर्थ व्यायाम मंदिर, त्यानंतर अन्तोनिओ डिसिल्वा, दादर आणि आता आय.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूल, खेरवाडी, बांद्रा इथे बापूंच प्रवचन होतं.
८) मराठीमध्ये साईबाबांची अकरा वचन, विष्णुसहस्त्रनाम, रामरक्षा या विषयांवर, तर हिंदीमध्ये ललितासहस्त्रनाम व श्रीसाईसत्चरित्रावर प्रवचन होतं.
९) बापूंच्या प्रवचनाला आल्यावर अनेकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याचा अनुभव येतो. जीवनप्रवासाचा मार्ग सापडतो आणि त्याचं जीवन संपूर्णपणे बदलून जातं. हे प्रवचन फक्त आपल्याचसाठी होतं, असा अनेकांना अनुभव येतो. बापूंची प्रवचन म्हणजे अध्यात्म - अभ्युदय व परमार्थ ह्यांच्या प्रत्येक दिशेला गवसणी घालणारे व अचूक वेध करणारे अक्षय बाणच.
१०) बापूंच्याच शब्दांत सांगायचं झालं तर बापूंची गादी नाही. ह्याचाच अर्थ, बापूंनंतर दुसरा कोणीही त्यांची जागा घेण्याचा प्रश्नच येत नाही, अगदी त्यांची मुलंसुद्धा नाहीत.
११) बापूंनी आपल्या मुलांना चांगलं शैक्षणिक करिअर करायला लावलं. बापूंचे सुपुत्र डॉक्टर पौरस हे एम.बी.बी.एस. असून सध्या जेरियाट्रिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत, तर त्यांची सून सौ. निष्ठा वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
बापूंची मुलगी सौ. शाकंभरी वैद्यकीय शिक्षण घेत आहे, तर जावई - स्वप्निल दत्तोपाध्ये हे इंजिनिअर असून त्यांनी 'law ' ची डिग्रीही घेतली आहे.
१२) बापूंचा वेषही आजच्या युगाप्रमाणेच आहे. ते shirt pant मध्येच वावरतात. भगवी वस्त्रं, रुद्राक्षमाला, टीळा, गळ्यात हार, लांब केस, दाढी अशा कुठल्याही बाह्य तथाकथित उपचारांची त्यांना गरज वाटत नाही. 
१३) बापूंना श्रीमंत-गरीब, उच्च-नीच, उच्चशिक्षित-अशिक्षित, जात-पात यांत काहीही फरक नाही.
१४) स्वतः एक आदर्श गृहस्थाश्रमी असणारे बापू, प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो हे तत्त्व स्वतःच्या आचरणातून शिकवितात. अध्यात्म म्हणजे पळवाट नाही. स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या झटकून, घरसंसार सोडून, मुलाबाळांना सोडून अंगाला राख फासण म्हणजे परमार्थ नव्हे. 'ज्याचा प्रपंच खोटा, त्याचा परमार्थही खोटा' हे बापू ठामपणे सांगतात.
१५) बापू कोणाकडूनही भौतिक गुरुदक्षिणा स्वीकारत नाहीत. गुरुपौर्णिमा, अनिरुद्धपौर्णिमेलासुद्धा ते गुरुदक्षिणा, हार, फुलं, मिठाया स्वीकारत नाहीत. बापू सांगतात - मला द्यायचच असेल तर रामरक्षा, घोरकष्टोद्धरण, हनुमानचालिसा, सुंदरकांड या गोष्टी द्या.
१६) बापूंच्या मार्गदर्शनाखाली जुईनगर येथे गुरुकुल, कर्जतजवळ कोठींबे येथे गोविद्यापीठम, रत्नागिरी येथे अतुलितबलधाम ह्या तीर्थक्षेत्रांची स्थापना करण्यात आली. ह्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्यंत पवित्र व स्वच्छ वातावरण असते.
१७) बापूंनी स्थापन केलेल्या तीर्थक्षेत्रांमध्येदेखील हार, फुले, मिठाया स्वीकारल्या जात नाहीत. तिथे साधी दक्षिणापेटीही नाही.
१८) संस्थेचे चार समारंभ वगळता बापू कोणाकडून औक्षणसुद्धा करून घेत नाहीत. अनेक जणांच्या लग्नसमारंभांना व मंगलप्रसंगी ते उपस्थित राहतात, तरीदेखील ते कोणाकडूनही औक्षण करून घेत नाहीत.
१९) 'पावित्र्य हेच प्रमाण' , तसंच अध्यात्म आणि आधार ही त्रिसूत्रीच बापूंच्या प्रत्येक कार्याचा पाया आहे आणि बापूंचे हे एकमेव असं तत्त्व आहे, जे कधीही बदलू शकत नाही आणि ज्याला हे पटत नाही, त्याला ह्यातून बाहेर पडावच लागेल.
२०) 'आधी केले मग सांगितले' ह्या उक्तिनुसार बापू स्वतः आधी प्रत्येक गोष्ट करतात आणि मगच ती इतरांना सांगतात. बापू स्वतः रोज चरखा चालवितात, रामनामाची वही लिहितात, एक तास चालण्याचा व्यायाम करतात, स्वतः रोज श्रीसाईसत्चरित्रचा एक अध्याय, गुरुचरित्राचे दोन अध्याय, विष्णुसहस्त्रनाम, श्रीरामचरितमानसाचे अख्खे सुंदरकांड, श्रीरामरसायन ग्रंथ, दत्तबावनी, वासुदेवानंद सरस्वतीविरचित 'दत्तमाहात्म्य' ग्रंथाचा एक अध्याय, रामरक्षा याचं वाचन करतात.
२१) बापू सांगतात, 'भक्ती करणं हे भेकडांच नाही, तर शूरांच लक्षण आहे. शिवाजीमहाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस हे प्रथम भक्तच होते आणि हे थोर देशभक्तही होते व म्हणूनच ते शौर्य गाजवू शकले.'
२२) बापू सांगतात, 'दिवसाच्या चोवीस तासांतील कमीतकमी चोवीस मिनिटे तरी परमेश्वराच्या नामस्मरणासाठी, प्रेमपूर्ण भावस्मरणासाठी एकनिष्ठेने द्यायला हवीत.'
२३) बापू स्वतःला संतसुद्धा मानत नाहीत आणि 'मित्र' हीच त्यांची भूमिका कायम असते.
२४) अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणूनच आजच्या युगात कॉम्पुटर वापरता न येणं म्हणजे अशिक्षित, असं बापू ठामपणे सांगतात.
२५) पूर्वीपासूनच बापू दत्ताच्या देवळात जायचे आणि आपल्या दादरच्या क्लिनिकच नावदेखील त्यांनी 'दत्त क्लिनिक' ठेवलं आहे.
२६) पहिल्यापासून त्यांच्या घरी महिषासूरमर्दिनीची मूर्ती आहे.
२७) पहिल्यापासून त्यांच्या घरी गणपती बसवला जातो. बापूंच्या घरच्या गणपती - उत्सवात तर लाखोंच्या संख्येने भाविक सामील होतात आणि गणपतीविसर्जनासाठी निघणारी प्रचंड मिरवणूक ही तर भक्तिरसाचे उधाणच असते.
२८) श्रीअनिरुद्धांनी स्वतःच्या पंचगुरुंबद्दल स्पष्टपणे प्रतिपादन केले आहे, ' दत्तगुरू हे माझे करविता गुरु आहेत, गयात्रीमाता ही माझी वात्सल्य गुरु आहे, श्रीराम हे माझे कर्ता गुरु आहेत, श्रीहनुमंत हे माझे रक्षक गुरु आहेत व श्रीसाईनाथ हे माझे दिग्दर्शक गुरु आहेत.'
२९) ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदासादि मराठी संतांबरोबरच तुलसीदास, पुरंदरदास, त्यागराज, अळवार, सूरदास, चैतन्य महाप्रभू, मीराबाई अशा बहुभाषिक संतांच्या जीवनाची व वाड्मयाची विशाल ओळख करून देणारे.
३०) समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक, भीमरूपी महारुद्रा स्तोत्र, दासबोध ह्या रचनांप्रमाणेच संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजींच्या श्रीरामचरितमानसाचे सुंदरकांड, हनुमानचालिसा, संकटमोचन हनुमानाष्टक ह्या रचनांबद्दल बापू वारंवार सांगत असतात.
३१) बापूंबरोबर शिरडी, अक्कलकोट, देहू-आळंदी गोवा (मंगेश-शांतादुर्गा) ह्या रसयात्रा व पंढरपूरची भावयात्रा केलेल्या भाविकांनी भक्तीचे अविस्मरणीय अनुभव घेतले आहेत.
३२) बापूंनी जुईनगरला स्थापन केलेल्या मंदिरात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्यांच्याबरोबरच मंगेश-शांतादुर्गा ह्या दैवतांचीही स्थापना केलेली आहे. बापूंच्या क्लिनिकमध्येही पहिल्यापासून मंगेशाचा फोटो होता.
३३) प्रत्यक्षमध्येदेखील गजानन महाराज, साईबाबा, स्वामी समर्थ, राम, कृष्ण, हनुमंत इत्यादि अनेक देवदेवतांची ध्यनचित्र रंगवण्यासाठी प्रकाशित होतात.
३४) गुरुवारच्या सत्संगामध्ये कलावतीआईंचे अभंग, गजरांचादेखील समावेश असतो.
३५) गोविद्यापीठं येथेदेखील निरनिराळ्या संतांचे फोटो लावलेले आहेत.
३६) श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराजात बापूंनी ९४ संतांच्या पूर्वसुरींचा उल्लेख केलेला आहे.
३७) बापू सर्वांकडून वर्षातून एकदा 'शिवलिंग पूजन' ही करून घेतात. तसेच 'अवधूतचिंतन' सोहळ्यामध्ये बापूंनी निरनिराळ्या आकाराच्या बारा ज्योतिर्लिंगाचे पूजन घडवून आणले होते.
  
बापू - चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व

१) कोणाला ते प्रवचनकार म्हणून भावतात.
प्रवचन करतानासुद्धा बापू shirt pant मध्येच बसतात. म्हणजेच बापू प्रचलित अर्थाने प्रवचनकार नाहीत; तर ते डॉक्टर आहेत आणि प्रत्येकाच्या मन, बुद्धी आणि शरीरावर ते उपचार करतात.
२) कोणाला ते मार्गदर्शक म्हणून भावतात.
अ) वेद, सहा शास्त्रे, उपनिषदे, अठरा पुराणे, तीस उपपुराणे, गीता, धर्मसिंधु ह्या ग्रंथांचा सखोल अभ्यास व चिंतन ह्यांमुळे तत्संबंधी विषयांवर सखोल मार्गदर्शन करणारे.
ब) श्रीसाईसच्चरितासारख्या श्रेष्ठ ग्रंथाचे भक्तांना सुस्पष्ट आकलन व्हावं व गैरसमज दूर होऊन भक्ती उचित मार्गाने करता यावी म्हणून स्वतः बापूंनीच पंचशील परीक्षा सुरु केल्या व पाचव्या परीक्षेसाठी practicals (प्रात्यक्षिकां) चीही रचना केली. पहिली पाच वर्षे सर्व प्रश्नपत्रिका बापू स्वतःच तयार करीत असत व स्वतःच सर्व उत्तरपत्रिका तपासतही असत. आतासुद्धा पंचशील पंचमीचा दुसरा पेपर बापू स्वतःच सेट करतात.
३) कोणाला ते नट म्हणून भावतात.
अ) बापूंनी शुद्ध लोकायतन स्थापन करून त्यामध्ये कीर्तन, गण-गवळण, सध्या जवळपास लोप पावलेले आयुधी-नमन, गोंधळ, भारुड, तोगना, भजनी भांडण व यक्षगान इत्यादि कलाप्रकारांचे दिग्दर्शन करताना बापूंना पाहणे, हा त्या कलावंतांच्या आयुष्यातील अविस्मरणीय व सुखद अनुभव आहे.
ब) ते उत्तम नट आहेत. कॉलेजात असताना त्यांनी 'मी अत्रे बोलतोय' हे नाटक सादर केलं होतं आणि ते कॉलेजच्या वाड्गमयमंडळाचे active सभासद होते.
४) कोणाला ते कलाकार म्हणून भावतात.
अ) बापू उत्कृष्ट चित्रकार आहेत. विशेषतः निसर्गचित्र व आशयघन मानवी जीवनचित्र हे त्यांच्या आवडीचे विषय.
ब) स्वतः हातात छिन्नी, हातोडा व पोलिशपेपर घेऊन सुबक मूर्ती घडवणारे. अश्वत्थ मारुती पूजनाच्या वेळेस जी मूर्ती आपण पूजतो, ती स्वतः बापूंनी आपल्या हातांनी घडवलेली आहे. (दगडातील अनावश्यक भाग काढून टाकला की त्याची सुंदर मूर्ती होते, त्याचप्रमाणे मानवाच्या मनावरील अनावश्यक पुट काढून टाकण गरजेच असतं, असं बापू वारंवार सांगतात.)
क) बापू सुंदर गातातसुद्धा, हे दीड लाख लोकांनी अनुभवलं, ते जेव्हा बापूंनी स्वतः न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात विविध गजर वेगवेगळ्या चालींवर घेतले तेव्हा.
५) कोणाला त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व भावतं.
६) कोणाला ते खेळाडू म्हणून भावतात.
अ) शाळा-कॉलेजात असताना एक उत्तम स्पोर्ट्समन म्हणूनही त्यांनी ख्याती मिळवली होती. उत्कृष्ट बॅडमिंटन व कबड्डीपटू. बापूंची क्रिकेटमधील बॉलिंग अजूनसुद्धा मुलांबरोबर खेळताना प्रत्येकाला प्रभावित करून जाते. बापूंचा लगोरीचा अचूक नेम अनेकांच्या परिचयाचा आहे. त्यांच्याबरोबर कबड्डी खेळलेले श्रीपती पाटलांसारखे त्यांच्या बरोबरचे विद्यार्थी आजही ह्याची साक्ष देतात. त्याचबरोबर ते एक उत्तम जलतरणपटू (स्विमर) देखील आहेत.
ब) ते उत्तम कुस्ती खेळत आणि बॉडी बिल्डिंग, मल्लखांबाचे उत्तम शिक्षक आहेत.
क) बापू स्वतः प्राच्यविद्यांमध्ये (इंडियन मार्शल आर्टस) निष्णात (मुद्गलविद्या, अश्वविद्या, फरीगदगा, सुर्यभेदन, यशवंती मल्लविद्या). बापू सांगतात, 'बलविद्यांमधून प्राप्त होणारी ऊर्जा जगामध्ये महत्त्वाचे सकारात्मक बदल घडवून आणू शकते.' आपल्या भक्तांनी समर्थ व स्वावलंबी व्हावे, ह्या उद्देशाने बापूंनी प्रथम आचार्य श्री. राविन्द्रसिंह मांजरेकर ह्यांना बलविद्येचे प्रशिक्षण दिले व आता प्रथम आचार्य व उपआचार्य हेच प्रशिक्षण इतरांना देतात.
७) कोणाला ते आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श बंधू, आदर्श सहकारी, आदर्श मित्र, आदर्श रक्षणकर्ता म्हणून आवडतात.
कुठल्याही मानापानाची जराही अपेक्षा न ठेवता कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून  सहजतेने प्रत्येक स्तरातील मानवाशी संवाद साधणारे बापू.
८) कोणाला ते उत्तम लेखक म्हणून भावतात.
अ) बापूंच्या समर्थ लेखणीचा अनुभव लोक वारंवार घेत आले आहेत. 'दैनिक प्रत्यक्ष' ह्या आपल्या बिगर राजकीय दैनिकातून अग्रलेखाच्या माध्यमातून ते लोकांना मार्गदर्शन करत असतात. अग्रलेखांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसाधारण विषयांबरोबरच समर्थ भारताचा इतिहास, तिसरे महायुद्ध ह्या लेखमाला लिहिल्या. तिसरया महायुद्धावरील लेखमालेवर आधारित 'तिसरे महायुद्ध' हे त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालं आहे.
ब) सध्या संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासांच्या सुंदरकांडावर आधारित 'तुलसीपत्र' ही लेखमाला ते लिहित आहेत. बापूंचे अग्रलेख हे प्रत्येकाचा जीवनविकास घडवून आणणारे आणि दैनंदिन जीवनात उचित मार्ग दाखवणारे आहेत.
क) त्याचबरोबर त्यांनी 'आवाहनं न जानामि' आणि 'तदात्मानं सृजा म्यहम' ही, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रसंगांचा आधार घेऊन सर्वसाधारण माणसाला मार्गदर्शन करणारी पुस्तकही लिहिली आहेत.
ड) मुख्य म्हणजे त्यांनी श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराजाच लेखन केल आहे. सत्य, प्रेम आणि आनंदाच्या मार्गावर चालून आपला समग्र जीवनविकास करून घेण्यासाठी श्रद्धावानाच आचरण कस असायला हव, ह्यासंबंधी मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराजाचे तीन खंड प्रसिद्ध झाले आहेत - 'सत्यप्रवेश' , 'प्रेमप्रवास' आणि 'आनंदसाधना' .
इ) त्याशिवाय प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनावरील 'श्रीरामरसायन' आणि आदिमाता महिषासुरमर्दिनीवरील 'मातृवात्सल्यविंदानम' ह्या ग्रंथांच लेखनही त्यांनी केल आहे.

अनुभवकथन

दर वेळेस बापूंची महती सांगताना आधी स्वतःचा अनुभव सांगणे आणि त्यानंतर 'कृपासिंधु' मध्ये आलेले नवनवीन ५-६ सर्वसमावेशक अनुभव सांगणे. उदा. उदीचा महिमा, असाध्य रोग, अपघात, अपमृहे त्यू, बाधानिवारण, पादुका हेच बापू, बापूंचा फोटोदेखील बापूच, लोकेटचे अनुभव. कृपासिंधुमध्ये आलेल्या काही अनुभवांची नावे येथे उदाहरणादाखल दिलेली आहेत.

१) डॉक्टर राजीव कर्णिक
२) विलाससिंह पांडजी
३) सुमेधा कुमार
४) फाल्गुनी फाटक
५) स्वाती कापरे
६) किरण कुरणे
७) हेमंत कावले
८) प्रमोद बाजपेयी
९) सरला जोशी
१०) डॉक्टर अजय राघव
११) अपूर्व सरकार
१२) कॅप्टन सुभाष paul
१३) हवालदार संतोष राळे (भारतीय सेना)
१४) डॉक्टर तलाठी
१५) सत्यप्रसाद वाजपेयी
१६) प्रीती पोतनीस

बापूंच्या मार्गदर्शनाखाली चालणारे कार्य

१) रक्तदान मोहीम (श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन)
२) आपत्तीनिवारणाच प्रशिक्षण ( अनिरुद्धाज अकादमी ऑफ डिझास्टेर म्यानेजमेंट)
३) वैद्यकीय व आरोग्य सेवा (दिलासा मेडिकल ट्रस्ट आणि रिह्यबिलिटेशन सेंटर)
४) गुन्हेगार व बालगुन्हेगार पुनर्वसन (श्री अनिरुद्ध आदेश पथक)
५) मतीमंद - कर्णबधीर - कुष्ठरोग्यांची सेवा (अनिरुद्ध समपर्ण पथक)
६) वेगवेगळ्या रुग्णालयांत चालणाऱ्या सेवा
७) अंधांची सेवा (अनिरुद्धाज बँक फोर द ब्लाइंड)
८) वृद्धांची सेवा (अनिरुद्धाज इंस्टीटयूट ऑफ जेरियाट्रिक्स आणि रिसर्च सेंटर)
९) महिलांसाठी प्रकल्प - आत्मबल, अहिल्या संघ (श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी)
१०) मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी धांगडधिंगा शिबीर (श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी)
११) तेरा कलमी योजना (श्री अनिरुद्ध आदेश पथक)
१२) अन्नपूर्णा योजना (श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन)
१३) इको- फ्रेन्डली गणपती
१४) गणपती विसर्जन व पुनर्विसर्जन
१५) श्रद्धास्थानांची, शाळांची, हॉस्पिटलची स्वच्छता
१६) व्हर्मिकल्चर प्रोजेक्ट
१७) वृक्षारोपण आणि सामाजिक वनीकरण
१८) व्यसनमुक्ती केंद्र
१९) पल्स पोलिओ
२०) रामराज्य


आध्यात्मिक कार्य


१) दर गुरुवारी बापूंचे होणारे प्रवचन

No comments:

Post a Comment