Saturday, 28 February 2015

Excerpts from Sadguru Aniruddha Bapu's Thursday Discourse (26.02.2015)

शिवपंचाक्षरी मंत्र आपण म्हणतो. पण आपला गुरूवारी आवाज लहान असतो. मग हळू हळू आवाज वाढत जातो. आणि मग आज जसा झाला तसा आवाज खुप चांगला असतो. कारण आम्हाला वर्षातुन एकदाच आठवण येते कि वालुकेश्वर येतं! मग आपण म्हणुया हे स्तोत्र. हे स्वत: नंदी ने लिहीलेलं स्तोत्र आहे..
पण प्रत्येक नाही जमलं तरी एका श्रावणी सोमवारी पंचाक्षरी मंत्र बोललात, तर काय झालं??
आपण जो जप करताना counter (खुण, चकती) वापरतो तो आम्ही डॉक्टर वापरायचो.
सर्व मंगल मांगल्ये हा जप 108 वेळा म्हणायला जास्तीत जास्त 24 मिनिटे लागतात..मग ट्रेन मधे कधी तरी हे पण करा नं..इतर गोष्टी ही पहा..पण कधी हा जप 108 वेळा करायला काय हरकत आहे? दररोज नाही तरी कधी तरी एकदा?/
श्रावणी सोमवार 4 असतात पण त्यातल्या एकदा तरी पंचाक्षरी मंत्र म्हणुया..जास्त नाही पण जमेल तेवढा..पण तेवढा ही आपल्याकडे वेळ नसतो. मान्य आहे माणुस आहे की विसरतो. पण वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला पुर्ण वर्षात काय करायचं ते लिहून घ्या..
आता डायरी वापरणं सोडुनच दिलं आहे. One Page डायरी ही आपण वापरत नाही. किचनच्या कॅलेंडर वर आपण दुधवाला आला कि नाही, फुलपुडी आली कि नाही हे लिहायला वापरतो. कारण इथे पैशाचा भाग येतो.
माणुस हा काही न काही विसरू शकतो त्या साठी डायरी करण्याची सवय लागली पाहिजे.
मग कधी तरी मधेच शिवपंचाक्षरी मंत्र म्हणायला हरकत नाही.
आधी आपण आराधना ज्योती चं पुस्तक वाचायचो. पण आता कोण कोण ते वाचतात? पुर्ण नाही, तरी काही तरी त्यातलं वाचलं, तर काय बिघडलं??
जे आवडेल ते नक्कीच करा.
तहान लागल्या नंतर विहीर खणायला काय अर्थ आहे??
मग अधुन मधुन अशी मंत्र, स्तोत्र म्हणायला काय हरकत आहे?? नुसतं Unconditional (बिनशर्त) प्रेम म्हणुन. काही मागण्यासाठी नाही..
हे आपण जे मंत्र म्हणतो ते आधी कोणी तरी खुप आधी म्हटले असतात. तर ते आपल्या साठी फायद्याचं असतं!
हे वर्ष प्रेमाचं आहे, तर देवावरचं प्रेम ही 15% वाढवा..
आज तरी 26. मग पुढच्या गुरूवारी 5 मार्च, मग तेंव्हा काय आहे होळी..तो कुठे होतो, तर साई निवास ला. का? तर साई बाबा, मुर्ती रुपाने तिथे आले होते. मग त्याच्या नंतरच्या गुरूवारी म्हणजे 12 मार्चला sharp (ठीक) 7.30 च्या आधीच मी (बापू) बोलायला चालू करणार आहे. आणि त्या दिवशी तुम्ही "सर्वानी, श्री श्वासम् चा उत्सव कसा असणार आहे ते अनुभवायचं आहे. त्या उत्सवात सहभागी व्हा..आणि साधारण तेंव्हा 9.45 पर्यंत बोलणं चालू असेल. मग 2.30 तास एका जागी कसं बसणार? तर मधे ब्रेक मिळणार नाही आणि मी ही (बापू) घेणार नाही.. मग मधे माझ्या मनाला वाटलं तर मधेच 5 मिनिटांची सुट्टी देईन..
श्री श्वासम् चा आनंद जीवनात उतरवायचा आहे. आणि त्यातलं किती महत्वाचं आहे ते त्या दिवशी मी कव्हर करणार आहे. अवधुतचिंतन सारखं ह्या श्री श्वासम् चं पुस्तक येणार आहे..
श्री श्वासम् हे जीवनातलं सर्वात मोठं Gift आहे जे मी तुम्हाला देतोय.
तुम्हाला सर्वोच्च तिर्थक्षेत्र दिलं ते 'गुरूक्षेत्रंम'
तुम्हाला एक सर्वोच्च धाम दिला तो म्हणजे 'प्रथमपुरूषार्थ धाम'.
आणि अजुन एक गोष्ट आहे ते 'अमळनेर ला जे चालू आहे ते..नक्की काय ते नाही सांगत आत्ताच..
अग्रलेखात जी नावं येतात त्यांचे पंथ असलेले लोक, आजही त्यांच्या गुप्त उपासना चालुच आहेत..त्यातली बिजॉयमलाना ही, सॅथाडॉरिना बनुन फिरतेय तरी इतरांना कळत नाही आहे, कि ती बिजॉयमलाना आहे..
आपल्या जीवनात आपल्याला अनेक वाईट गोष्टींचा नाश करायचा आहे तर हा श्री श्वासम् जीवनात आपल्याला उतरवला पाहिजे..
श्री श्वासम् ही सर्वोच्च भेट आहे जी बापू आपल्याला देत आहेत. ह्यात माझे असे काहीच नाही. जसा मी ग्रंथात दिला आहे तसाच..मग तुम्ही म्हणाल की तुमचं काही नाही तर मग काय समजायचं?? सर्वात important (महत्वाचं) म्हणजे "मी इथे काही द्यायला बसलो नाही, हे माझ्या मनातच नाही आहे."
आई जे दुध तयार करते ते बाळासाठी तयार करते. ते दुध त्या बाळासाठी भीक नाही. आणि हेच  आपलं चण्डिका कुलाशी असलेलं नातं आहे.
श्री श्वासम् म्हणजे "The Healing code" (निरोगी करणारा) मग त्या दिवशी तो श्री श्वासम् समजुन घ्यायचा आहे. आणि तो accept करायचा (स्विकारायचा) आहे त्या उत्सवात..
बापू आमचं ठीक आहे पण आमच्या नंतरच्या पिढीचं काय?? ते ही त्या दिवशी कळेल. मग आम्ही त्या दिवशी काय करायचं????
त्या दिवशी प्रत्येकाने एकच करायचं आहे..कि जमलं तर कमीत कमी एक वेळ हनुमान चालिसा करून या..कितीही करा, पण मोजू नका. स्वत:च्या मनाला ही कळू देऊ नका, कि किती केलंय. का करायचं? तर बापूंनी सांगितलं म्हणुन..मला 'का' असं विचारलेलं आवडत नाही. हे 2007 ला मी सांगितलं आहे..कि मी उत्तर देऊ शकणार नाही..
कोणी येताना हनुमान चालिसा म्हणायला विसरलात तर इथे येऊन म्हणा किंवा घरी जाताना म्हणा.. त्या दिवशी रात्री 12 पर्यंत म्हणा..
त्यात काही तरी अधिक चांगलं मिळेल..त्या दिवशी कोणाची परिक्षा आहे तर येऊच नका..त्याच्या सी.डी. दर वर्षी सगळ्या केंद्रांवर लावता येईल..दर वर्षी एकदा तरी ही सी.डी. केंद्रावर लावलीच पाहीजे..
श्री श्वासम् हे आपल्या भारत वर्षात सत्य युगामध्ये आपलं जीवन सुखी करण्या साठीची एक गोष्ट होती. आणि ह्या युगात आपल्या कडे जगदंबेच्या कृपेने येत आहे, तर त्याचा नक्की उपभोग घ्या..मग आपल्याला पुढच्याच्या पुढच्या गुरूवारी भेटायचं आहे..
2015 साल हे अधिक गोष्टींसाठी वेगळं वेगळं आहे..हे लक्षात घेऊया..
पुढच्या गुरूवारी श्री श्वासम् च्या बरोबर मी 'श्री सुक्ता'चं ही प्रवचन करणार आहे. मग ह्या श्री सुक्तावर बोलायला चालू करणार आहे. हे असं महान सुक्तं आहे, ज्यात काय नाही, असं नाही! त्यात 15 श्लोक आहेत तरी ह्यात सगळं काही आहे. त्यात सगळं science (विज्ञान) आहे. जे अजुन माहीत पण नाही, असं विज्ञान त्यात आहे. पुढच्या गुरूवारी योगिंद्रसिंह श्री सुक्ताचं पठण करतील.
एक गुरूवार योगिन्द्रसिंह आणि एक गुरूवार विशाखावीरा असं सुक्त पठण करतील आणि दोन्ही ही चाली वेगळ्या असतील

Saturday, 22 February 2014

Sadguru Aniruddha Bapu's Thursday Discourse (13.02.2014)

॥ हरि ॐ ॥

सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा, आशीर्वाद, बिनधास्त... लहान मुलांपेक्षा मोठ्यांनी टाळ्या वाजवल्या. बरोबर, परीक्षा प्रत्येकाची चालू असते.

आता स्वस्तिक्षेम संवाद जो करायचाय तो वेगळ्या पध्द्तीने ... आधी सर्व मंगल मांगल्ये... म्हणणार मग डोळे बंद करायचे नाहीत... प्रवचन होईल आणि मग शेवटचा मंत्र. यातच तुमचा संवाद साधला जाणार आहे. हा असा संवाद काही दिवस असेल कायम नाही.

आजपर्यंत आपण अंकुरमंत्रातील ॥ ॐ रामवरदायिनी श्री महिषासुरमर्दिन्यै नमः ॥ हे पद बघत आलोय. आजपासून अंकुरमंत्रातलं चौथे पद

॥ ॐ रामनामतनु श्री अनिरुध्दाय नमः ॥ हे पद बघणार आहोत.

इथे आपल्याला नीट पहायचंय राम म्हणजे काय? रामनाम म्हणजे काय? रामनामतनु म्हणजे काय? अनिरुध्द म्हणजे काय? ते पहायचे आहे. अनिरुध्द म्हणजे किचकट, complicated, समजायला कळायला कठीण. हा जो कुणी आहे तो तिचा लेक आहे. हा अनिरुध्द नक्की कोण? हा राहतो कुठे? करतो काय? हा आला कुठून? रामनामतनु म्हणजे काय? नक्की हा माझ्याशी - सगळ्यांशी कसा जोडलेला आहे?

आपण मातृवात्सल्यउपनिषदामध्ये बघतो, तीर्थयात्री असतात. परशुराम, नित्यगुरु आणि त्रिविक्रम. त्यातला त्रिविक्रम म्हणजे अनिरुध्द. हा कोणाचा नाही. हा पूर्णपणे, स्वतंत्रपणे प्रगटवला गेला आहे. या त्रिविक्रमाची माहिती आपण पाहिली. त्याचं अदभूत चिन्ह आपण गुरुक्षेत्रम्मध्ये पाहतो. हा त्रिविक्रम एकाच वेळेस तीन पावलं चालतो म्हणजेच एकाच वेळॆस तीन पावलं उचलतो. आपण एका वेळेस एकच पाऊल चालू शकतो. हा तीन पावलांत तीन लोकं व्यापू शकतो. स्थूलदेह, प्राणदेह, मनोमय देह व्यापतो. तीर्थयात्रा सुरू होते. हा त्रिविक्रम नित्यगुरु, परशुराम, उत्तम, मध्यम, विगताला बरोबर घेऊन आहे. हाच मैत्रेयीला देखील थांबायला सांगतो. विगतच्या डोळ्यांची पट्टी काढायला हाच सांगतो.

ह्या त्रिविक्रमाचा नक्की रोल काय? त्रिविक्रम हा प्रगटविला गेला पण कधी? याचं रूप काय? हा काळा? गोरा? ह्याला डोळे किती? कान किती? याचं रूप नक्की काय? त्रिविक्रमाचं अदभूत चिन्ह काय आहे? कृपासिंधूत ह्यावर योगिन्द्रसिंह जोशी यांनी छान लेख लिहिला आहे. नक्की हा त्रिविक्रम म्हणजे उत्पन्न केलाय का? प्रकट केलाय? ह्याचं प्रगटणं म्हणजे नक्की काय? चण्डिकाकुलामध्ये त्रिविक्रम आहे का? की नाही आहे? नक्की काय आहे? चण्डिकाकुलात आपण पाहतो ती माय चण्डिका बसलेली आहे. तिच्या एका बाजूला दत्तगुरु तर दुसर्या बाजूला हनुमन्त आहे. किरातरुद्र आणि शिवगंगागौरी आहे. देवीसिंह आहे. मग त्रिविक्रम कोठे आहे? जर हा चण्डिकुलाच्या बाहेरचा नाही तर त्याचा फोटो का नाही चण्डिकाकुलामध्ये? हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे.
मनुष्याच्या जीवनाच्या स्वार्थाचा प्रांत असो कि नि:स्वार्थाचा प्रांत असो, आपल्या प्रत्येकाला स्वत:त बदल आवश्यक असतात व त्यापेक्षा बाहेरच्या जगात बदल हवे असतात. माणूस तिसर्या माणसाला ओळखू शकतो पण स्वत:ला नाही. स्वत:मध्ये बदल घडवणे आवश्यक असते. आपले ध्येय काय असते.

- अनुकूल बदल आत घडवणे

- अनुकूल बदल बाहेर घडवणे

- अनुकूल बदल प्रारब्धात घडवणे

हे सगळे बदल एकाच वेळेस, All Three Simultaneously. ही तीन पावलं ह्या त्रिविक्रमाची. तिन्ही गोष्टी (अनुकूल) एकाचवेळी घडणं. ह्या तीन गोष्टी म्हणजे त्याची तीन पावले एकाच वेळेस पडत असतात.

साप चावणं हे जर प्रारब्ध असेल तर एकाच वेळेस त्याचे प्रारब्ध बदलणं (त्याच्या प्राणमय देहाला जपणं), सापाचं विष शरीरात भिनणार नाही हे पहाणं त्याचवेळेस Doctor उपलब्ध करून देणं हे सर्व एकाचवेळेस पाहतो, करतो. तो त्रिविक्रम पूर्ण रात्र झालीय, रात्रीचे बारा वाजलेत तरीही उगवतीचा सूर्यही असणं, मध्यान्हीचा सूर्य असणं व मावळतीचा सूर्य असणं असं तिघांनाही आणून ठेवतो आणि रात्रदेखील अबाधित ठेवतो तो त्रिविक्रम. हे तिन्ही करण्याची ज्याची ताकद आहे तो त्रिविक्रम. हे मनोराज्य नाही, सत्य आहे. आपण प्रत्येकजण अनुभवतो.

आपण श्वास घेतो. तो फुफ्फुसात जातो. श्वास बाहेर पडतो या एकामागोमाग घडणार्या क्रिया आहेत. एकाच वेळी होत नाहीत म्हणजे एकापाठोपाठ पडणारी पावलं. पण त्याच क्षणाला Morning walk घेताना track-suit घातलायं, आणि समोर साप आला आणि त्याने फस्स केलं तर काय होईल? दातखिळी बसेल, हात-पाय थरथरतील, घशाला कोरड पडेल, जीभ लुळी पडेल, तोंडाला फेस येईल, पोटात गोळा येईल, वर कोरडं आणि खालून..... एकाच वेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडतात. हो ना? कशामुळे? भीतीचा stimulus. कारण Adernaline हा Sympathetic Nervous System चा भाग आहे. ही विविध भागांवर एकाच वेळेस काम करते. कशी? एक महत्वाची Nerve आहे vagus nerve जी वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळे कार्य करते. ही एकच nerve stimulate झाली की stomach मध्ये acid चं secretion वाढते. Diaphragm च्या वर suppression चं काम करते तर खाली stimulate करते. हार्टचा pulse rate कमी करते. हीच nerve शी / शू पास करण्याच्या नियंत्रणाचं महत्वाचं काम करते. प्रजननाच्या control चं पण काम करते. म्हणजेच एकाच वेळेस वेगवेगळ्या अवयवांवर वेगवेगळं कार्य करते.

असाच त्रिविक्रम असला पाहिजे. जशास तसा. चांगल्यासाठी अतिशय चांगला. वाईटासाठी अतिशय वाईट. त्याला कुणी कितीही शिव्या घातल्या तरी ह्याला काही फरक पडत नाही. त्याची जी माय चण्डिका हिला जो आपलं मानत नाही त्यांना तो आपले मानत नाही. त्याच्या आई ’चण्डिकेवर’ विश्वास ठेवतो की नाही हाच criteria. जे चण्डिकेचे भक्त नाहीत त्यांच्यासाठी हा criteria नाही. त्या भक्तामध्ये कितीही चुका / पापं असेना, त्यांच्याकडे जी क्षमता असेल त्या क्षमतेनुसार तो वागतो.

समजा जर भक्त पांगळा असेल, त्याची ताकद पण ५०% कमी झाली असेल. तर तो ती कमी ताकद हा त्रिविक्रम बनतो, त्याला दुरुस्त करतो मग बाहेर पडतो म्हणजेच तो ५०% पूर्वी जसा होता तशी स्वत:ची प्रतिकृती तयार करतो, त्या माणसात ती फीट करतो व तरीही नामानिराळा राहतो. हे एक कौशल्य त्या त्रिविक्रमाचे आहे जशास-तसा.

आम्ही एवढ्या चुका करून ठेवल्या आहेत तर तो दुरुस्त करणार कसा? हा त्रिविक्रम सातत्याने स्वत:ची कंपनं पोहोचवत असतो. ब्रम्हाण्डच ज्याचं शरीर आहे तो त्रिविक्रम काय करू शकत नाही? आम्ही ह्या त्रिविक्रमाची एक क्षुल्लक पेशी आहोत पण त्याची आहोत. आम्ही त्याच्या शरीराचा part & parcel आहोत. आम्ही त्याच्या शरीराचा लहान का होईना पण भाग आहोत, म्हणून तो त्याची स्पंदनं सतत पसरवत राहतो.
त्रिविक्रमाचं हृदय सर्वांमध्ये स्वत:ची कंपनं पाठवतो. ते कायम pumping करतं म्हणून मी जिवंत आहे. Heart म्हणजे ’प्रेम’ म्हणजेच त्याचं प्रेम कायम आमच्यापर्यंत पोहोचणारच असतं. जी vibrations pump करणार ती आपोआप माझ्यापर्यंत पोहोचणारच आहेत.

१. जर चण्डिकेला मानता तरच त्याचा हिस्सा आहोत.

२. Block कधी तयार होतो? जेव्हा त्रिविक्रमावर विश्वास ठेवत नाही. Heart Attack कसा येतो? Heart ला supply करणार्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो तेव्हा. जेव्हा मनुष्याचा त्रिविक्रमावर विश्वास नसतो तेव्हा हा Block तयार होतो. चण्डिकाकुलावर विश्वास आहे म्हणजे त्रिविक्रमावर विश्वास आहेच. हा त्रिविक्रम काम कसा करतो? हा एका विशिष्ट mechanism मध्ये काम करतो. हे वैश्विक आहे. गणित तयार नाही केलं गेलं. उत्पन्न नाही केलं गेलं. हा पण एक algorithm च आहे. हा algorithm आज आपल्याला बघायचा आहे.

1 x 1 = 1
11 x 11 = 121
111 x 111 = 12321
1111 x 1111 = 1234321
11111 x 11111 = 123454321
111111 x 111111 = 12345654321
1111111 x 1111111 = 1234567654321
11111111 x 11111111 = 123456787654321
111111111 x 111111111 = 12345678987654321

ह्या निसर्गात घडणारी प्रत्येक क्रिया ही या algorithm सारखी घडते. तो एकच असा आहे.

त्रिविक्रम = १ (no. 1). १ ने कोणत्याही संख्येला भागून काहीही फरक पडत नाही आणि १ ने गुणलं तरी तेवढंच राहतं.

ह्या सृष्टीत सगळीकडे हा त्रिविक्रमच फिरतोय. एकाच वेळी तो स्वत:त दोन वेळा बनू शकतो. जर तुमची frequency ३ वेळची आहे तर तो ३ वेळा बनू शकतो. प्रत्येक वेळी जेव्हा तो स्वत:ला multiply करतो तेव्हा सगळीकडे हा त्रिविक्रमच खेळतोय. हा सगळा ९ पर्यंतचा खेळ समर्थपणे तो खेळतो. त्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज त्याला नाही आहे. हा Bilaterally symmetrical बनतो. म्हणजेच समान न्याय देतो. मध्यरेषेच्या दोन्ही बाजूला समान. तुमच्यासाठी हा खेळ खेळत असताना तुमची जी frequency ची गरज आहे तिकडे तो तुम्हाला आणून ठेवतो. जर ९ आहे तर ९ वर आणून ठेवतो. तो स्वत: कायम एकच राहतो. तो एकच जरी असला तरी त्याचवेळेस दुसरा ’१’ पण त्याच्याकडे तयार आहे, ३ रा पण त्याच्याकडे आहे.

’एक’ च आकडा बेरीज नाही, वजाबाकी नाही, भागाकार नाही त्रिविक्रमाने जेव्हा सृष्टी उत्पन्न केली ती गुणाकाराच्या पद्धतीने म्हणजेच progress कसा आहे तर fast आहे. Progress is fast. ही ताकद एकट्या त्रिविक्रमाची. तो ’एकच’ असतो. तो कायम ’एक’ च आहे आणि म्हणूनच त्याने दिलेला शब्द कधीच बदलत नाही. त्याचं वचन ’एक’, त्याचा संकल्प एक’, त्याचं अस्तित्व ’एक’ तो कोणालाही copy करत नाही आणि त्याची copy कुणीही कधीच करू शकत नाही. म्हणून तो ’एक’च.

He does not copy anybody and No one can copy him

असा तो एकमेव ’एक’

हा सगळा प्रवास आपण बघतो तो दोन्ही बाजूने समान. आपल्या शरीरात ९ चक्र, ७ जागृत, २ सुप्त अवस्थेत.

हा एक असताना (Bilaterally Symmetrical), जशी घडी घातलेली असेल तशीच उलगडली तर चुरगळत नाही.

आपण काही करतो तेव्हा ताकद कमी पडते. प्रारब्धातील पुण्याचा साठा संपलाय. तर त्याची परतफेड तोच करतो तुम्ही जर चौथ्या स्टेजवर आहात. सगळं आहे पण हा नाही तर काहीही नाही. आमचा याच्यावर प्रचंड विश्वास असायला हवा. हा स्वत:च कर्ज देतो आणि स्वत:च ते कर्ज फेडतो. असा सावकार कुठे जगात मिळणार नाही. हा एकच असा आगळा वेगळा.

हा एकच असा आहे. जो ह्यासाठी व्रत करेल, तपश्चर्या करेल पण जोपर्यंत चण्डिकाकुलावर विश्वास आहे. चण्डिकाकुलाला मानता आणि जर त्रिविक्रमावर विश्वास नसेल तर त्या त्रिविक्रमाचा तुमच्याकडचा supply त्याची ती आई बंद करते. ती कवाडं बंद करते. (बये दार उघड...) तुम्ही त्याला लाथाडलंत तरीही तो तुमच्यावर प्रेम करतच राहतो पण ती ते तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही.

हा जो सातत्याने झगडतोय, जीव तोडतोय त्याच्यावरच जर विश्वास नाही तर ती माय चण्डिका उभी राहते. तिला तिच्या लाडक्या त्रिविक्रमाची काळजी आहेच. जेव्हा चुकीची माणसं या त्रिविक्रमाचा चुकीच्या पद्धतीने फायदा घ्यायला बघतात आणि तरीही तो मदत करायला बघतो तेव्हा ही माय चण्डिका काय करते?

ती फक्त एकच करते. ही आदिमाता दुर्गा

१ २ ३ ४ ५ ६ ७ ॥८ ९

८ या स्थानी येऊन उभी राहते. त्याचा पुढचा प्रवास ती होऊ देत नाही. ती परतफेड त्या माणसाची त्या माणसालाच करावी लागते. स्वत:ची कर्जे स्वत:लाच फेडावी लागतात. जी खूप difficult असतात.

मग आम्हाला काय करायचे? तर आमचा त्या त्रिविक्रमावरचा विश्वास डळमळू न देण्यासाठी त्याच्या आईची प्रार्थना करायची. त्रिविक्रमावरचा विश्वास म्हणजे त्रिविक्रमाच्या हेतूवरचा विश्वास. तिने दिलेले नियम खूप strict आहेत. ते सर्व पाळून, तुमच्यासाठी जो सतत Partiality करतो, धडपडत राहतो, सतत प्रयास करतो त्यावर विश्वास हवा. त्याच्या हेतूविषयी विश्वास हवा. जे माझ्या जीवनात घडतेय ते ती माय चण्डिका तिच्या पुत्रांकरवी घडविते. आम्हाला जे काही हवंय ते आम्ही परमात्म्याकडून मागतो. इथे त्रिविक्रमाचा दुसरा सिद्धांत आमच्या लक्षात यायला पाहिजे. त्रिविक्रम तुम्हाला काय हवे त्यापेक्षा तुमच्यासाठी काय आवश्यक आहे ते पुरवितो. त्याच्या हेतूविषयी आम्हाला विश्वास हवा की, हा जे काही आमच्या आयुष्यात करतो ते आमच्या चांगल्यासाठीच असायला पाहिजे मग भले ती गोष्ट वाईट असेल, अशुभ असेल तरीही ती माझ्या चांगल्यासाठीच. माझ्या जीवनात जे काही घडतेय ते ती माय चण्डिका त्याच्या इच्छेने घडविते. जरी वाईट घडले तरी त्यातून चांगलंच होईल हा विश्वास.

ह्या त्रिविक्रमाच्या Algorithm ला ’एकांक’ Algorithm म्हणतात. एकांक : तो एकच : प्रत्येक shape, आकार तो घेतो rhythm मध्ये. ह्यात आम्हाला झेपेल असा क्रम आहे. तो १ ते ९ आकडे तयार करतो rhythm मध्ये. तुमचा प्रवास क्रमाक्रमाने घडवून आणतो. धक्काबुक्की नाही.

आपण माणसं एका वेळी एकच पाऊल टाकू शकतो हे तो जाणतो म्हणून तो एक झाला. तुमचा स्वभाव एक आहे म्हणून तो एक. तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट क्रमवार का घडते? त्रिविक्रमामुळे माझं अधिकाधिक चांगलं तोच घडवून आणणार आहे. He always cares for you, हा विश्वास हवा मग धक्के खात खात जगावं लागत नाही.

त्रिविक्रमाचा नंबर १, त्याचा algorithm देखील १. ह्यापुढे त्रिविक्रमाच्या हेतूबद्दल पूर्ण विश्वास ठेवायचा. आता कायम एक गोष्ट लक्षात येईल, आमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट क्रमाक्रमाने का घडते तर त्रिविक्रमामुळे. माझं अधिकाधिक चांगलं तोच घडवून आणणार आहे.

आता शांत चित्ताने डोळे बंद करून आदिमातेचे तुम्हाला आवडते रूप, प्रतिमा डोळ्यांसमोर आणा आणि काहीही मागू नका. आज तो त्रिविक्रम तुम्हाला BEST असेल तेच देणार आहे.

॥ नम: सर्वशुभंकरे। नम: ब्रम्हत्रिपुरसुन्दरी। शरण्ये चण्डिके दुर्गे। प्रसीद परमेश्वरि ॥

॥ हरि ॐ ॥

Thursday Discourse of Sadguru Aniruddha Bapu (30.01.2014)

॥ हरि ॐ ॥

श्रीस्वस्तिक्षेम संवाद .................

मी माईक लावायला विसरलो तर, आवाज पोहोचला नाही. तोच माईक आहे पण नेहमीच्यामधली एक गोष्ट राहिल्याबरोबर थोडसं वेगळं झालं. आज परीक्षेला बसणारी बरीचशी मुलं आली आहेत, मुलांनो तुमच्या आजूबाजूला सगळे बसले आहेत, त्यातील प्रत्येकजण आयुष्यभर परीक्षा देत असतो. त्यांचं म्हणणं असं असतं की, त्यांची परीक्षा देव घेत असतो, नाहीतर त्यांचं नशीब घेत असतं. परीक्षा येते, म्हणजे ती तुमच्या मागे लागत नाही. तुम्ही शाळेत admission घेता, मग शाळा परीक्षा arrange करते. तुम्ही परीक्षेला बसायचं ठरवलं नाही तर तुम्हाला कोणी फोर्स करणार नाही. एस.एस.सी., बी.ए. होण्यासाठी परीक्षा देत असतो, प्रमोशनसाठी परीक्षा देत असतो. मग लग्न करताना नवरा-बायकोची परीक्षा असते. निवड कोण कोणाची करतं? नवरा म्हणतो, ‘मीच चुकलो, हिला चांगला बकरा मिळाला’ तर बायको म्हणते, ‘मीच चुकले निवड करताना, ह्यांना सगळं सहन करणारी बायको मिळाली.’ म्हणजे मी परीक्षा घ्यायला चुकलो. खरंतर दोघेही पास झालेले असतात किंवा दोघेही फेल झालेले असतात. मी पास झालो नाही म्हणजे मी परीक्षा घ्यायला चुकलो. आपण परीक्षा घेताना चुकतो ते जास्त महत्वाचं आहे. परीक्षा appear करताना चुकलो तर, परत चान्स असतो. पण घेतानाच चुकलो म्हणजे आमची गणित सोडवायची पद्धतच चुकलेली असते.

आपण भाजी-फिश आणताना दुकान, माल, निवडताना परीक्षा तुम्ही घेताय आणि पैसेही तुम्हीच देता. शाळेत परीक्षा घेतली जाते तेव्हा पैसे देतो का? शाळेतील परीक्षा देऊन मुलांना डिग्री मिळत असते. परीक्षा देतोय की घेतोय हे देवाण-घेवाणीवर, कोणाला काय मिळतंय ह्याच्यावर सगळं ठरतं. ज्याला काही घ्यायचं असेल तर, त्याला परीक्षा द्यायला आणि घ्यायला लागते. आपण नेहमी परीक्षा देत असतो, घेतही असतो.

परीक्षा घेताना मी चुकलो म्हणून देताना मी चुकतोय म्हणून माझ्या जीवनात अडचणी येतात. जीवनात प्रत्येकाचा ‘मी’ परीक्षा देत आणि घेत असतो. आम्ही वारंवार परीक्षा घेत असतो, म्हणून आम्हाला परीक्षा देण्याचं भय वाटत असतं. कारण परीक्षा घेण्यात आपण चुकलेलो असतो.

मी कॉलेज, शाळेत असताना रोज रात्री परीक्षा घ्यायची असते, आज काय शिकलो हे आठवलं पाहिजे. आठवड्याभरात जे काही शिकलो ते वाचलं का? शिकलो एवढचं. जे interview घेताना स्वत:ची अशी परीक्षा घेतात त्यांना परीक्षा देणं कठीण जात नाही.

परीक्षा घेण्यात आम्ही चुकलो नाही तर, परीक्षा देण्यात आम्हाला घाबरायचं कारण उरत नाही. वृत्रासुर काय कोणीही आमची परीक्षा घेऊ शकत नाही. आम्ही स्वत:च्या चुकीच्या परीक्षा घेतो. म्हणजे काय? मी चार वडापाव खाल्ले, फुकट आहेत म्हणून दोन आणखी खाल्ले म्हणजे आम्ही स्वत:च्या पोटाची, पचनशक्तीची परीक्षा घेतली.

उद्या interview आहे त्यासाठी वाचणं आवश्यक आहे. आज रविवार आहे म्हणून उशिरा उठतो, पिक्चरला जातो. रात्री आठवण येते interviewची. मग वाटतं एकदा वाचलं आहे परत वाचण्याची आवश्यकता नाही. अर्ध्या तयारीने परीक्षेला जाणं म्हणजे स्वत:ची चुकीची परीक्षा घेणं, स्वत:च्या क्षमतेला त्रास देणं. आपल्याला पूर्ण प्रयत्न करायचे असतात यश किती द्यायचं हे त्याचं काम आहे.

प्रयत्न करणे माझे काम । यशदाता मंगलधाम ॥

मंगलधाम म्हणजे चण्डिकाकुल. धाम म्हणजे घर. कुल म्हणजे प्रेमाने उत्पन्न झालेलं घर. संपूर्ण चण्डिकाकुल यश द्यायलाच बसलेलं आहे. आपण माणसं आहोत आपण perfect असू शकत नाही. माझं चण्डिकाकुलावर प्रेम असेल तर, चण्डिकाकुल माझ्यासाठी partiality करणारच आहे, हे स्वत:च्या मनाला न बजावणं म्हणजे स्वत:ची चुकीची परीक्षा घेणं आहे.

परीक्षा द्यायला जाताना, घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार करणं, मग हातावर दही ठेवलं जातं हे सगळं काय आहे? इथे परीक्षा देण्यासाठी आपण एकटे जात नाही तर तो देव आपल्याबरोबर आलेला असतो. परीक्षेला जाताना देवाला सांगायचं, ‘देवा ये माझ्याबरोबर.’ पेपर लिहायला सुरुवात करताना हात जोडून म्हणायचं, ‘तू आला आहेस. माझा ठाम विश्वास आहे की, तू माझ्या बाजूलाच आहेस.’ त्याला बसायला कुठे जागा मिळणार ह्याचा विचार तुम्ही करू नका. ‘तू माझ्या टेबलावर बसलेला आहेस, माझ्या पेनात तू आहेस.’ हा विश्वास असणं म्हणजे स्वत:ची चुकीची परीक्षा न घेणं माझा सगळा अभ्यास झालेला असला तरी तो माझ्याबरोबरच पाहिजेच. ‘देवा, तू माझ्याबरोबर ये’. ‘तू माझ्याबरोबर आलेलाच आहेस, प्रश्नपत्रिकेत तूच बसलेला आहेस, माझ्या पेनात तू बसलेला आहेस, माझ्या उत्तरपत्रिकेत ही तूच बसलेला आहेस. हा विश्वास असायला हवा. एकदा तो बरोबर आला की, सगळ्या गोष्टी सरळ होतात. विषमता निघून जाते. स्ट्राँग-दुर्बळ हे सगळं निघून जातं.

मुलं शाळेत, नोकरीला जायला लागली की मुलं परत येईपर्यंत आई काळजी करत असतात. ही काळजी करत बसणं म्हणजे स्वत:ची चुकीची परीक्षा घेणं आहे. मी घरी बसून काळजी केल्याने मुलात फरक पडेल का? नाही पडणार. तर सहा तास काळजी करण्यापेक्षा सहा मिनिटं देवाचं नाव घेणं, आईला सांगणं, ‘आई जा गं माझ्या बाळाबरोबर’, देव माझ्या बाळाबरोबर आहेच हा विश्वास असणं, ह्याने फरक पडेल.

बहुतेक स्त्रियांना पाठदुखी, कंबरदुखी सुरू होते. त्याला हजारो नावं असतात, पण बेसिक काय असतं तर पाठीचा कणा दुखत असतो. पाठीचा कणा म्हणजे काय तर सगळं शरीर - डोकं, दोन हात-पाय, फुफ्फुसं, लिव्हर हे ज्याला जोडलेलं असतं तो main part म्हणजे पाठीचा कणा. तोच मूळ आधार आहे. तोच धैर्य आहे. पाठीचा कणा म्हणजे धैर्य तो कोणापुढेही नमणार नाही. जेव्हा आम्ही धैर्य गमावून बसतो तेव्हा पाठदुखी सुरू होते. पाठदुखीमागे खरं कारण काळजी आणि भीती वाटणं हे असतं.

बायका नेहमी म्हणत असतात की डिलिव्हरी नंतर वात घुसला अंगात. वात घुसू नये म्हणून अंगात स्वेटर घातला जातो, कान झाकले जातात. कानाला काय भोक आहे हवा आता शिरायला. तरी वात घुसतोच. मूल झाल्यावर रगडू नका, धुरी देऊ नका. सिझरियेन झालेलं असेल तर ह्या गोष्टी अहितकारक आहेत. पूर्वीच्या वेळी डिलिव्हरीची system वेगळी होती. त्यावेळची हवा वेगळी होती, polluted नव्हती. त्या स्त्रियांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यांचे मसल्स स्ट्राँग होते. हल्ली प्रेग्नंट बाईला किती जपलं जातं. जरा ती हलली की काहीतरी वाईट घडेल असं वाटत असतं. तिला वाकायला देत नाहीत. पण ह्या काळात वाकायला पाहिजेच त्यामुळे मसल्स strong होतात. ह्या काळात डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली तर आराम करायला हवा. नाहीतर दीड तास चाललं पाहिजे, रुटीन कामाची ही सवय पाहिजे. लहान मुलांच्या अंगाला तेल चोळू नका, धुरी देऊ नका म्हणून मी नेहमी सांगत असतो. त्यामुळे हवेतले गॅसेस बॉडीला चिकटून राहतात त्यामुळे घामाची छिद्र बंद होतात आणि त्यामुळे अनेक विकार होऊ शकतात. हे सगळं करणं म्हणजेच स्वत:ची चुकीची परीक्षा घेणं. मॉडर्न कपडे नुसते घालून मॉडर्न होता येत नाही. तर जुन्यातलं चांगलं, नव्यातलं चांगलं दोन्ही लुक घेऊन मॉडर्न होता येतं.

आम्ही नेहमी आमच्या स्वत:च्या चुकीच्या परीक्षा घेत असतो. कारण आमचा कशावरच विश्वास नसतो. आमचा सगळ्यावर तात्पुरता विश्वास असतो. गायनॅकोलॉजिस्टवरही आमचा डिलिव्हरी पुरताच विश्वास असतो. त्याच्याआधी आणि नंतर नसतो. डॉक्टरचं काम फक्त डिलिव्हरी करून देणं इतकंच आहे. त्याच्या आधी-नंतर जे करणं आवश्यक आहे ते करायची आमची तयारी नसते. डायबेटिस आहे, गोड कमी खायचं आहे तरीही गोड जास्त खातो आणि स्वत:ची चुकीची परीक्षा घेतो.

आम्हाला विश्वास पूर्ण ठेवायला हवा. विश्वास ९९% आहे, १% नाहीये, अर्धा आहे अर्धा नाहीये असं कधीच होत नाही. विश्वास पूर्णच असायला हवा. प्रेम आणि विश्वास ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रेम आणि विश्वास एकतर आहे किंवा नाही. फक्त १% आहे तर ते नाहीच आहे. जिथे प्रेम आहे तिथे विश्वास असतोच. माझं ह्याच्यावर प्रेम आहे पण विश्वास नाही किंवा विश्वास आहे पण प्रेम नाही असं होऊ शकत नाही. विश्वास आणि प्रेम हे एकत्रच राहतात. विश्वास आहे पण प्रेम नाही आणि प्रेम आहे पण विश्वास नाही हे दोन्ही चूकच. प्रेम हे प्रेम असतं. मग तुम्ही म्हणाल आम्ही डॉक्टरवर विश्वास ठेवू शकतो पण प्रेम कसं करणार. डॉक्टरवर डॉक्टर म्हणून प्रेम असायला पाहिजे, माणूस म्हणून नाही. डॉक्टरने केलेली फायरिंग प्रेमाने स्वीकारता आली पाहिजे. डॉक्टर पहिला डॉक्टर म्हणून चांगला आहे, तो चांगला डॉक्टर आहे, चांगला माणूस आहे हा विश्वास असायला पाहिजे.

शाळेवर विश्वास नाही म्हणून ट्युशन ठेवायची ट्युशनवर विश्वास नाही म्हणून मग स्वत: अभ्यास घ्यायचा ह्या सगळ्यात आपण मुलांच्या मनाचा विचार करत नाही. २५ वर्षापर्यंतच्या वयापर्यंत प्रत्येक माणसाची हीच भावना असते की, जगात मी एकच शहाणा आहे, आई-बाबांना काही कळत नाही. ह्याला गद्धेपंचविशी म्हणतात. प्रत्येक आई-वडिलांनी लक्षात घेतलं पाहिजे की आम्हीही ह्यातून गेलेलो आहोत.

मुलांवरचं ओझं कमी करणं हे आई-वडील-शिक्षक ह्यांचं काम आहे. आपल्या मुलांना कमी मार्क पडले तर त्याला ओरडायला हवंच पण त्याला आधी जवळ घ्या. पास झाल्यावर नंबर कितवा आला हे नंतर बघा आधी त्याची पप्पी घ्या. आम्हाला आमचं प्रेम express करता आलंच पाहिजे. माझी पणजी माझ्या आजीला प्रेमाने फटका मारायची आणि तिची पप्पी पण घ्यायची.

तर मुलांना आई-वडिलांबद्दल विश्वास वाटला पाहिजे. मुलं चुकतील, मुलांना चुकण्याचा अधिकार आहे पण मुलाचा जन्म झाल्यावर आई-वडील म्हणून चुकण्याचा अधिकार मोठ्या आईच्याचरणी अर्पण करायचा. आम्ही माणसं आहोत आम्ही चुकू शकतो पण मोठी आई आहे आपल्याला संभाळायला. आईवडिलांनी मुलाला ओरडून नाही तर प्रेमाने सांगायला हवं.

तुम्ही रेल्वेचा प्रवास केला आहे का? रेल्वेच्या गाडीत पहिल्या डब्यात ड्रायव्हर असतो. रिक्षाचे, टॅक्सीचा ड्रायव्हर तुम्ही बघितलेत. ह्या दोघांच्यामधील फरक काय आहे? रेल्वेच्या ड्रायव्हरला काय qualification लागते माहीत आहे का कोणाला?  तो Electrical Engg. कमीतकमी डिप्लोमा होल्डर तरी असावाच लागतो. पण आम्हाला ही साधी गोष्ट माहीत नाही. तो Central Govt.चा जॉब असतो. Electrical हा option सगळ्यात शेवटी असतो. त्याला स्कोप नसतो. आम्ही बघतो सगळीकडे फक्त Computer Engineer त्याआधी Mechanical Engineers ची लाट मग Civil Engineer, गल्लीच्या गल्ली असतात. हे सगळं प्रवाहाबरोबर वाहत जाणं आहे. पहिल्यांदा स्विमिंगपूल मध्ये पोहायला शिका, मग प्रवाहात पोहायला शिका त्यानंतर मग प्रवाहाच्याविरुद्ध पोहायला येईल.

आमचा विश्वास कमी पडतो का? कारण आमचा स्वत:वर विश्वास नसतो. ह्यालाच आपण थर्व - गोंधळ (confusion) म्हणतो. हे करायचं की ते करायचं हीच गोंधळाची परिस्थिती असते. अथर्वशीर्ष मस्तकातला गोंधळ (confusion) दूर करतं. अथर्वचा दुसरा अर्थ आहे पूर्ण माहिती, ज्ञान. (complete / detailed knowledge)

मला काय बनायचं आहे? आमचं नेहमी चुकतच असतं, आम्ही दुर्दैवी आहोत, असं वाटत असतं. आपण वजनदार पक्ष्याचं उदाहरण बघुया. सगळ्यात वजनदार पक्षी घार घेऊया. झाडाच्या फांदीवर बसताना तो विचार करत नाही की ही फांदी तुटेल का? झाड तुटेल का? तुम्ही असे बसू शकाल का? नाही कारण तुम्हाला भीती असते पडण्याची, कपाळमोक्ष होण्याची. पक्षी का बसतो कारण पक्ष्याचा स्वत:चा पंखावर विश्वास आहे. त्याला विश्वास असतो की झाडाची फांदी तुटली तरी मी पडणार नाही. पक्ष्याला पंख ही जी काही परमेश्वराने दिलेली बेस्ट गोष्ट आहे ती त्याने शोधून काढली आणि ती तो वापरतो. पक्ष्याला जन्मानंतर लगेच नाही उडता येत, त्यासाठी सुरवातीला प्रयास करावे लागतात. अनेकदा धडपडतो मग जमतं.

दहा गोष्टी करून बघायच्यात, प्रयत्न केल्याशिवाय आमची ताकद, आमचे पंख आम्हाला कळत नाहीत. आदिमातेने प्रत्येकाला दिलेलं व्यक्तित्व हे पंख आहेत. तुम्ही कधीही खाली कोसळणार नाही, की तुमचा कपाळमोक्ष होणार नाही. व्यक्तिमत्व हा चांगला गुणधर्म आहे, चांगलं qualification आहे आदिमातेने दिलेलं, तुमचं प्रारब्ध बदलण्यासाठी. पक्ष्यांना ती observation मधून कळते. ते सतत ट्राय करतात. आम्ही ट्राय करतच नाही. जी लाट येते त्याच्याबरोबर वाहत जातो. एक सुंदर कविता आहे. ‘मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची.......’.

आम्ही १० गोष्टी ट्राय करून बघू त्या करताना स्वत:चं सगळं शारीरिक आणि मानसिक स्किल वापरू मग आम्हाला कळेल आमच्यात काय चांगलं आहे. ए-१ पेक्षा ए-५ ही quality चांगली आहे तर ती मला वाढवायला हवी. हे सगळं कळेल. Qualities वापरल्या गेल्या की त्या कळणार. माझ्यातल्या सुप्त गुणांचा शोध घेण्यासाठी आधी स्वत:ची परीक्षा घेणं थांबवा. स्वत:चा शोध घ्या. मी काय-काय चांगलं करू शकतो, माझ्यात काय-काय चांगलं आहे ह्याचा शोध घ्या. येस्, मी चांगला आहे हे मनात भिनलं गेलं पाहिजे. माझं चुकत असलं तरी माझा बाप मला सांभाळेल. स्वत:चा शोध घेताना स्वत:चं स्वत:तलं बेस्ट शोधा.

आमचा परमात्म्यावरचा विश्वास डळमळीत का होतो? राम आला तेव्हा फक्त वानरांनीच त्याला पुजलं, कृष्णाला पाच पांडव आणि गोपांशिवाय कोणीही देव मानलं नाही, साईबाबा जिवंत होते तेव्हा आता जेवढी गर्दी होते त्याच्या एक शतांश लोकही त्या काळात नव्हते. कारण त्यांच्याकडे बघताना तो देव आहे हे कोणाला कळलंच नाही. आम्ही त्याच्यात देव बघत असतो. आम्हाला त्याला आधी बेस्ट मानव मानलं पाहिजे. त्याच मानवत्व पटलं पाहिजे, तरच त्याला देव मानता येईल. ज्यांना हे कळलं ते खूपच भाग्यवान होते. कैकयी, मंथरा, कौरव, यादव - यादव तर प्रत्यक्ष कृष्णाच्या राज्यात राहत होते. पण काय झालं? Physical presence does not matter. आम्ही त्याच्या जवळ physically आहोत ह्यामुळे तो खूश होणार नाही. आमचे प्रेम किती आहे, विश्वास किती आहे हे महत्वाचे आहे. चण्डिकाकुलाचं नातं प्रेम आणि विश्वास ह्यावरच असतं. प्रेम आणि विश्वास आहे का? हे महत्वाचं आहे. आमचं प्रेम, विश्वास कमी पडत असेल no problem पण माझं aim १०८% प्रेम आणि विश्वास वाढवणं हेच हवं. त्याच्यावर पूर्ण प्रेम आणि विश्वास करता आलाच पाहिजे. आपल्याला आपल्यातल्या चांगल्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहेच, त्याच्याबरोबर मला त्याची प्रत्येक चांगली गोष्ट घ्यायची आहे, अनुभवायची आहे. आमच्यातले कमी points आपल्याला down करतात, तसंच आम्ही देवामध्ये कमीपणा शोधतो तेसुद्धा तेच करतं.

हेमाडपंतांनी साईसच्चरितामध्ये दुसर्या अध्यायात गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या स्नेह्याच्या मुलाचा मृत्यू
त्याच्या गुरुसमोर होतो त्यामुळे त्यांच्या मनात विकल्प निर्माण होतो - गुरुची आवश्यकता काय? म्हणून ते शिर्डीला जाण्याचं टाळतात. पण नंतर नानासाहेब चांदोरकर त्यांना सांगतात सगळं सोडून दे आणि शिरडीला चल. ते जातात.

फक्त यश-अपयशच नाही तर आमचा इगोही दूर सारता आला पाहिजे. आमचा इगो नेहमी आड येत असतो. काल साई माझ्याशी चांगले होते, आज मला ओरडताहेत. अरे काल तू चांगला वागत होतास, आज तू चुकतोयस म्हणून ओरडतात. मग आमच्या मनाचा खेळ सुरू होतो - हा देव आहे की नाही? हा देव मला सहाय्य करणार की नाही? हा संशय आला की आपण नियमांच्या प्रांतात येतो. मग जेवढं प्रारब्ध घेऊन आलात तसंच नियमानुसार घडणार. मनापासून त्याच्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही इच्छेच्या प्रांतात येता. तो तुमच्यासाठी पार्शलिटी करतो. हे स्वत:चा शोध घेतल्याशिवाय जमणार नाही. स्वत: स्वत:ची परीक्षा घेणं आणि देवाची परीक्षा घेणं ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्याच आहेत.

आज जो अल्गोरिदम आपण बघणार आहोत हा mathematics चा सिद्धान्त आहे. Fibonacci Numbers ही एक series आहे. म्हणजे आधीच्या दोन nos. ची बेरीज म्हणजे पुढचा no. म्हणजे १+२=३, ३+२=५, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४ अशी जी infinity बनत जाते ते Fibonacci Numbers.

तुमचे आताचे जीवन म्हणजे तुमच्या आधीच्या दोन जन्मांची बेरीज आहे. आधीच्या दोन जन्माचं पाप-पुण्य घेऊन तुम्ही जन्माला येता. Fibonacci Numbers च्या सिंद्धाताप्रमाणे आम्ही जन्म घेतो. X1+X2 =X3, X2+X3 = X5 ह्यामध्ये कुठल्याही टप्प्याला आम्ही असलो तरी, प्रत्येक क्षणाला त्याच क्षणाला जगत असतो. तुम्ही कधीही भूतकाळात किंवा भविष्यकाळात जगत नाही. हातात तुमच्या फक्त वर्तमानकाळ आहे. भविष्यकाळ कशाने घडतो तर, भूतकाळ अधिक वर्तमानकाळ ह्याने घडत असतो. आजचा मी वाईट उद्याचा चांगला होऊ शकतो. म्हणून वर्तमानकाळात जागृतता असायला हवी. आधीच्या मिनिटात अडकू नका आणि पुढच्या मिनिटाची काळजी करू नका.

हा अल्गोरिदम आमचं जगण्याचं सूत्र सांगतो. प्रत्येक क्षणाची गोष्ट सांगतो. भूतकाळ अधिक आताचा वर्तमानकाळ आणि तुम्हाला हवाहवासा वाटणारा भविष्यकाळ. भूतकाळ माझ्या हातात नसतो. चांगला भविष्यकाळ हवा असेल तर ह्या क्षणाला चांगलं वागलं पाहिजे. भविष्यकाळ चांगला हवा असेल तर तो मी वर्तमानकाळातच बदलू शकतो. १+२ =३, २+३ =५, ३+५=८ हे मागचे नंबर्स म्हणजे भूतकाळ, तो constant राहतो. पुढचं गणित करताना आधीचा नंबर असतोच. पुढचा नंबर काय आहे ह्याच्यावर तुमची उत्तरं ठरत असतात. भविष्य सुंदर करायचं असेल तर मग वर्तमानकाळ सुंदर करायला हवा, हे हा अल्गोरिदम सांगतो.
ही गोष्ट आईच्या बाबतीतही कुठे दिसते. आई आम्हाला स्पष्टपणे दाखवते. प्रत्येक मनुष्यामध्ये हा अल्गोरिदम फिट केलेला आहे आणि तो constant आहे. आणि तिने तो फिक्स करून दिलेला आहे.

महाकालीला हात किती? = १०, महासरस्वतीला हात किती? = ८ तर त्या The Great महिषासुरमर्दिनी महालक्ष्मीला किती हात आहेत? तर १८ हात. महालक्ष्मी आणि महासरस्वती ह्या दोघींचे एकत्रीकरण म्हणजे महिषासुरमर्दिनी महालक्ष्मी. एका बाजूला सौम्य शांत महासरस्वती मध्ये प्रचंड महिषासुरमर्दिनी. महाकाली सगळ्यांच्या आधी सृष्टी उत्पन्न होताना ती प्रकटली. ती दहा हातांची आहे. ती प्रार्थनेने प्रकटली. ब्रह्मदेवाला कळतं आपण चुकलोत. त्याला कळलं परमात्मा हाच एकमेव तारणहार आहे आणि आदिमाता एकमेव स्वामिनी आहे. तिचा अल्गोरिदम तोडण्यात अर्थ नाही. त्याला ज्ञान प्राप्त होते. म्हणून ती प्रज्ञास्वरूप आहे. हा ब्रह्मदेव दहा ऋषिंना प्रार्थनेने प्रकटवतो. आपण चुकलो हे त्याने जाणलं हे जाणणं म्हणजे महासरस्वती. ते दहा आणि आठ एकत्र झालेत तेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. महाकाली प्रकटली, महासरस्वतीचं अस्तित्व जाणवलं मग महिषासुरमर्दिनी - महालक्ष्मी प्रकटली (१०+८=१८).

मिनिटाला आपण श्वास किती घेतो -१८, हृदयाचे ठोके किती होतात - ७२. आधी ठोके की आधी श्वसनक्रिया. श्वसन थांबलं की हृदयाचे ठोके थांबतात. हार्टबीट्स् बंद पडले की श्वसन आपोआप बंद पडतं. दोन्ही एकाच वेळेस असतील तर मग breathing ७२ वेळा आणि ठोके १८ वेळा का? अशुद्ध रक्त हार्टमध्ये ७२ वेळा पाठवलं जातं. तर फुफ्फुसाचे हार्टबीट्स् १८ वेळा होतात. एवढा ओव्हर टाईम झाला तरी आपलं सगळं चांगलं चालत असतं. दोन्ही क्रिया एकाच वेळेस चालतात. कारण breathing मुळे आपल्या वायुकोशात जेवढी हवा आत घेतो त्याच्या प्रत्येक प्रवाहाचा transform ह्याच पद्धतीने होत असतो. आपण O2 (Oxygen) आत घेतो आणि CO2 कार्बनडायऑक्साईड बाहेर टाकतो. हा बॅलन्स कसा होतो. आपल्या शरीरातून वाईट गोष्ट बाहेर टाकण्यासाठी चांगल्या गोष्टीची आवश्यकता असते. बाहेर टाकताना आपण Co2 टाकतो नुसता कार्बन आपल्याला बाहेर टाकता येत नाही. म्हणून ह्याच भावनेने आपण दिवाळीला केरसुणीची पूजा करतो. त्या क्षणाच्या आधीच जे आलेलं आहे आणि आता जे आहे ते १८ वेळा फुफ्फुसाने जे साठवलं आहे ते हया रेशोने वापरलं जातं. म्हणून आपण कायम शुद्ध हवाच आत घेत असतो. मनुष्य जन्माला आल्यावर पहिले हार्टबीट्स् आहेत. ब्रीदिंग (श्वसनक्रिया) जन्मल्यानंतर सुरू होते आईच्या पोटातून बाहेर आल्यावर. ७२ ही संख्या म्हणजे पहिली स्पंदनं आहेत. मुलांना आईच्या हार्टबीट्स्ची सवय असते.

७२ ही हार्टबीट्स्ची स्पंदन आहेत, तर १८ ही लंग्जची स्पंदनं आहेत. जो पर्यंत मुल आईच्या पोटात आहे तोपर्यंत त्याच्या हार्टबीटस्ची काळजी आई घेते. १८ हा नंबर मातृत्वाचा आहे. आदिमातेचा नंबर आहे. ७२ ही प्रत्येक बालकाची, प्रत्येक मानवाची संख्या ७२ आहे.

जिथे आम्हाला ४०० efforts करायचे आहेत, तिथे आई ते efforts १०० वर आणते. आम्ही असहाय्य आहोत तेव्हा ती आम्हाला उदरात घेऊन placenta chord द्वारे श्वास पुरवते. जेव्हा मी काही करू शकत नाही, माझं शारीरिक, मानसिक सामर्थ्य कमी पडतंय तेव्हा आईला आणि तिच्या पुत्राला हाक मारायची. तिच्या पुत्राचा नंबर म्हणजे १०८. १८+७२= ९० झालेत मग १०८ म्हणजे काय? हा १०८ नंबर म्हणजे पूर्णत्व. आईची बेस्ट निर्मिती म्हणजे तिचा पुत्र. मानवाला तिने ७२ बनवलंय त्याला बेस्ट बनण्यासाठी ३६ चा प्रवास करायचा आहे. १८ पासून ७२ चा प्रवास ५४ आहे. मनुष्य दोन्हीकडे connected असतो. त्याचं ध्येय मी राम, कृष्ण, साई, जानकी, रुक्मिणी सारखं होईन हे असलं पाहिजे. त्यांच्यासारखं व्ह्यायचं म्हणजे त्यांचे चांगले गुण घ्यायचेत. मूळ रूपापर्यंत जाणं म्हणजे ज्ञानमार्ग जो दुष्कर आहे. हा भक्तिमार्ग जो आहे, हा प्रवास दोन्ही दिशांनी आहे. अर्ध अंतर तुम्ही चाला, अर्ध अंतर तो चालतो. १८+१८=३६. प्रत्येक मानवात १०८ शक्तिकेंद्र आहेत. आम्ही मानव म्हणून जन्माला आलोत म्हणजे आमची ७२ केंद्र active आहेत. मला १०८ पर्यंत प्रवास करायचा आहे. सगळ्यात आधी नंबर आदिमातेचा हवा. हा नंबर जीवनात constant ठेवा. मला उत्तर हवंय परमात्मा म्हणजे मला बेस्ट व्हायचं आहे. माझं जीवन मला सुखाने भरून काढायचं आहे. म्हणून आदिमाता + मी = परमात्मा म्हणजे १८+( मी )=१०८ ह्यासाठी कमीतकमी मला ९० असायला पाहिजे. माझ्याकडे -१८ आहे म्हणजे इथे मला प्रत्येकाला बदललं पाहिजे. मला परमात्म्यासारखं बनायचं तर मला आदिमातेने सहाय्य करायला पाहिजे. १८ आणि १०८ हे नंबर्स फिक्स आहेत. मला फक्त बदलता येतं. आपण देवाला बदलायला जातो. आपण कमीतकमी ९० असायला हवं. आम्ही -१८ म्हणजे तिची नातवंड आहोत. आम्ही एक-एक नंबर कमी करू तेव्हा जीवन आपोआप आनंदी होईल. आम्ही तदाकार बनू म्हणजे आम्ही आमच्या जीवनात बेस्ट मिळवू, बेस्ट राहू. चमचा पूर्ण भरलेला आहे, ग्लास अर्धा भरलेला आहे, पिंप पाव भरलेलं आहे. तर पहिला नंबर चमच्याचा असेल कारण तो त्याच्या capacity नुसार पूर्ण आहे. दुसरा नंबर ग्लासाचा असेल, तो त्याच्या capacity नुसार अर्धा आहे, तिसरा नंबर पिंपाचा असेल कारण तो त्याच्या capacity नुसार पावच आहे.

आदिमातेने दिलेलं constant म्हणजे व्यक्तित्व जे सगळ्या प्रारब्धावर मात करू शकतं. जन्मत: -१८ असणं हे दु:ख आहे. हे दूर करायचे असेल तर आम्हाला स्वत:ला बदलले पाहिजे. आदिमाता १८ आणि परमात्मा १०८ म्हणजे परमात्मा आदिमातेशिवाय ९० आहे. मी आणि आदिमातेमध्ये जेवढे अंतर आहे तेवढेच अंतर माझ्यात आणि परमात्म्यामध्ये आहे. परमात्मा आणि आदिमातेमधलं अंतर जास्त आहे. १८ हे १०८ चं मूळ आहे. परमात्म्याला काही बनायच नाहीए. त्यांची अंतर, गणितं आम्हाला समजण्यासाठी आहेत. आम्ही जन्मत:च -१८ आहोत हे दूर करण्यासाठी काय करायला हवं.

‘मी’ हा कायम दुसरा असला पाहिजे. कारण तो change आहे. कालची गरज उद्या नसते. Take ego backseat. आमची गरज आहे म्हटल्यावर आम्ही नम्र होतो. गरज संपली की आम्ही ताठ होतो. गरज असेपर्यंत मनुष्य अहंकार backstage ला ठेवतो. आम्ही कसे जगत असतो? माझी गरज + मी ह्याचे उत्तर काय येणार? तर मला गरज आहे म्हणजे मी कमी आहे, मी फालतू आहे, दुर्बळ आहे, माझी लायकीच नाही, मी टाकाऊ आहे. पहिली माझी गरज. गरज पहिली आली आणि अहंकार मागे पडला तरी मी सबळ होत नाही. आदिमातेने पहिली सीट घेतली की तुम्ही -१८ असाल आणि तुमची श्रद्धा असेल तरी उत्तर १०८ च असते. तिच्या कारुण्यामुळे तिचा जेष्ठ पुत्र महाप्राण तुमचं जीवन चालवत असतो. तिचा तृतीय पुत्र परमात्मा, तुम्ही खरंखुरं प्रेम करता, तेव्हा तुमचा नंबर तो स्वत: ठरवतो कारण तो तुमच्यातच राहत असतो. आम्हाला जीवनात कळलं पाहिजे, गरज + मी = दुर्बलता, दुर्बळ + मी = फालतू, फालतू + मी = अपयशी, अपयशी + मी = नैराश्य, नैराश्य + मी =  पूर्ण वाया, व्यर्थ गेलेला.

त्याच्यावरचा विश्वास असणारा, चण्डिकाकुलावरचा विश्वास असणारा मी म्हणजे विश्वासू मी + माझी गरज = सामर्थ्य. गरज माणसाला असतेच. माझा त्याच्यावर विश्वास असला, चण्डिकाकुलावर विश्वास असला की मग आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ह्या अल्गोरिदममधून पुढे जात राहते. विश्वासू मी + माझी गरज = सामर्थ्य, सामर्थ्य + विश्वासू मी = गरजपूर्ती. विश्वासू मनुष्याची गरज त्याला समर्थ बनवते. विश्वास नसणार्या मनुष्याची गरज त्याला दुर्बळ बनवते. हा अल्गोरिदम तुम्हाला समर्थ करणारा आहे. म्हणून ह्याचं नाव काय आहे? विश्वासू मी + गरज = सामर्थ्य आणि सामर्थ्य कसं तर सतत वाढत जाणारं. म्हणून ह्याला ‘अनिरुद्ध गती’ अल्गोरिदम म्हणतात. हा अनिरुद्ध अग्लोरिदम आहे. हा आयुष्यात आल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. मी + गरज = दुर्बलता हा अल्गोरिदम वृत्रासुराचा आहे. वृत्रासुराला परमात्मा बनण्याची इच्छा आहे. तिच्या पुत्राला काही बनण्याची इच्छा नाही. तुम्हाला वृत्रासुराचा अल्गोरिदम हवा की अनिरुद्धाचा अल्गोरिदम हवा ह्याचा तुम्हाला choice आहे. मंदिर उभारलं गेलं आहे. Choice is yours. पण मी दिलेली धमकी मी कधीही मागे घेत नाही.

॥ हरि ॐ ॥

Saturday, 25 January 2014

January 23 Discourse

Read the excerpts / important points summarized from Parampoojya Sadguru Shree Aniruddha Bapu's discourse delivered on Thursday, 23rd January 2014 at Shree Harigurugraam:

http://manasamarthyadata.com/thursday_excerpts.php?id=94&lang=4

These are the important points summarized from Parampoojya Sadguru Shree Aniruddha Bapu's discourse delivered on Thursday, 23rd January 2014 at Shree Harigurugraam. The Compleate discourse will be uploaded in due course of time.

Monday, 20 January 2014

January 16 Discourse

Read the excerpts / important points summarized from Parampoojya Sadguru Shree Aniruddha Bapu's discourse delivered on Thursday, 16th January 2014 at Shree Harigurugraam:

http://manasamarthyadata.com/thursday_excerpts.php?id=93&lang=4

These are the important points summarized from Parampoojya Sadguru Shree Aniruddha Bapu's discourse delivered on Thursday, 16th January 2014 at Shree Harigurugraam. The Compleate discourse will be uploaded in due course of time.

Friday, 6 December 2013

Sadguru Shree Aniruddha Bapu

Dr. Aniruddha D. Joshi (Sadguru Shree Aniruddha Bapu)


Aniruddha Bapu unveiled his mission in the year 1996 and the last seventeen years have seen numerous activities and projects grow towards their realization.

Today bhaktas of Sadguru Shree Aniruddha Bapu have transcended all barriers of religion, caste, creed and nationality and spread not only across India but all over the globe. With the divine grace and inspiration of Sadguru Bapu, so many activities and projects happen constantly and so the volume of information to be communicated has increased manifold. manasamarthyadatas.com formed under the leadership and guidance of Sameer Dada, seeks to connect all bhakta friends of Sadguru Shree Aniruddha Bapu from all over the world to the events and happenings back home.

What is it that sets him apart from others on the face of this earth? HE is indeed a SADGURU who defies convention, whose profile is unique. A qualified doctor, MD – Medicine - a Rheumatologist of repute, he was born on the most auspicious day of Kartik Pournima (Tripurari Pournima) on November 18, 1956, in the early hours of dawn, at thirty five minutes past four.

A complete family man like any of us, he lives with his wife who is most reverently addressed as Nanda Mata, and his children – his son Pauras and his daughter Shakambhari. 
And so this perfect family person leading by example communicates through his own conduct that it is very much possible to achieve the highest purpose in life without in any way, turning away from worldly life. Spirituality does not in any way imply apathy towards worldly affairs. It consists in never losing sight of the fact that life is an offering unto the bhagavanta and every moment of our life is open to him. It is therefore a way of life….. a path that brings everlasting joy and peace. And that is what this unique Sadguru wants for all of His friends.

“I shall fill this world with happiness and abound with joy, all that be” Yes, that is his resolve, his wish for all of his friends and yes, that is the role He wishes to play – the role of a true friend, ‘I am not an avatar, not of anybody. I am Aniruddha….I am your friend, a friend who wants to see you happy”….
And so it will be…. as the very reassuring pledge of this ‘Friend’ is
‘You and Me firm together, nothing can stand in the way, ever!’

I Am with You, your companion, Be sure;
that All times, whatever your course.
You may, though for a rare moment, forget Me;
I will not, never, that's My word.